इक्बाल मिर्चीच्या तीन कुटुंबीयांबाबत मोठी बातमी, आर्थिक गुन्हे शाखेने केली घोषणा

इक्बाल मिर्चीच्या तीन कुटुंबीयांबाबत मोठी बातमी, आर्थिक गुन्हे शाखेने केली घोषणा

मुंबई, ता.26 : दाऊदचा विश्वासू इक्बाल मिर्चीच्या कुटुंबियांशी संबंधीत सुमारे 798 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणल्यानंतर आता मिर्चीच्या कुटुंबियांना फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे. विशेष पीएमएलए न्यायालयाने शुक्रवारी ईडीचा याबाबतचा अर्ज मान्य केला आहे.

मिर्चीची पत्नी हाजरा मेमन, दोन मुलं आसीफ व जुनैद यांच्यासह 13 जणांवर ईडीने डिसेंबर 2019 मध्ये गुन्हा दाखल केला होता. मिर्चीने बेकायदेशीररित्या मिळवलेल्या मालमत्तेतून भारतात मालमत्ता खरेदी केली. त्यानंतर ही मालमत्ता पुनर्विकासासाठी विकण्यात आल्याचा आरोप आहे. त्यात मिर्चीने बेकायदा खरेदी केलेल्या मालमत्तेचा लाभ त्याच्या कुटुंबियांनी घेतल्याचा आरोप आहे. ते या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी याप्रकरणी अनेकवेळा मिर्चीच्या कुटुंबियांना समन्स पाठवले होते. पण त्यानंतर ते हजर न झाल्यामुळे अखेर ईडीने मार्च महिन्यात मिर्ची कुटुंबियांविरोधात अजामिनपात्र वॉरट जारी करण्यासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली होती. 

ईडीची ती मागणी न्यायालयाने मान्य केली होती. त्यापुढे जाऊन ईडीने त्यांना फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. फरार आर्थिक गुन्हेगार कायदा 2018 अंतर्गत ही मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने ती मान्य केली आहे.

भारतातील गुन्हेगारीतून कमवलेल्या पैशांतून इकबाल इक्‍बाल मिर्ची व त्याच्या कुटुंबियांच्या नावावर लंडनमध्ये 25 मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील 16 मालमत्ता हाजरा मेमन हिच्या नावावर आहेत.याशिवाय युकेमध्ये चार कंपन्यांच्या नावावर सहा मालमत्ता आहेत. याशिवाय यूएईतील मिहाय इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन लि. या कंपनीच्या नावावरही लंडनमेध्य तीन मालमत्ता आहेत. याशिवाय एकट्या मुंबईत मिर्चीची बेनामी 500 कोटींहून अधिकची मालमत्ता आहे.

न्यायालयाने त्यांना आता फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यामुळे आता त्यांच्या मालमत्ता जप्त करणे शक्य होणार आहे. 

mumbai news family of don iqbal mirchi declared as absconding by special court

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com