'सर्वांसाठी पर्यटन'ला राज्यात प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

मुंबई - महाराष्ट्राच्या विकासाच्या केंद्रस्थानी पर्यटन असावे, या हेतूने संपूर्ण महाराष्ट्रात "सर्वांसाठी पर्यटन' ही संकल्पना राबवली जाणार आहे. गुरुवारपासून 25 ऑक्‍टोबरपर्यंत पर्यटनवाढीसाठी पर्यटन पर्व जाहीर करण्यात आल्याची घोषणा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये केली.

सहल आयोजक, हॉटेल-रिसॉर्ट चालक-मालक व इतर संलग्न व्यावसायिकांना पर्यटन क्षेत्रात भरीव योगदानासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. राज्यातील विविध ठिकाणी पर्यटनाशी संबंधित निबंध स्पर्धा, "बेस्ट ट्रॅव्हल स्टोरी' ही दृक्‌श्राव्य स्पर्धा, चित्रकला, हस्तकला प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम या वेळी होतील. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने दिवाळी सुटीच्या निमित्ताने राज्यभरात भ्रमण करण्यासाठी विविध आकर्षक पॅकेज तयार करण्यात आली आहेत. कार्यक्रमाला पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, पर्यटन खात्याचे प्रधान सचिव नितीन गद्रे, एमटीडीसीचे संचालक विजय वाघमारे, व्यवस्थापकीय सहसंचालक आशुतोष राठोड उपस्थित होते.

Web Title: mumbai news tourism all of us