रो-रो सेवेमुळे वाहतुकीवरचा भार होणार हलका

मंगेश सौंदाळकर
शुक्रवार, 16 जून 2017

वर्षाला 12 लाख प्रवासी करतात प्रवास
मुंबई - गेट वे ते मांडवा प्रवासी वाहतूक आता वर्षभर सुरू राहणार असून "सागरमाला' प्रकल्पांर्तगत मांडवा येथे अत्याधुनिक रो-रो जेट्टीच्या कामाला सुरवात झाली आहे. येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. या अत्याधुनिक जेट्टीमध्ये 150 गाड्यांचे वाहतनळ आणि प्रवाशांकरिता गोल्फकार असेल.

वर्षाला 12 लाख प्रवासी करतात प्रवास
मुंबई - गेट वे ते मांडवा प्रवासी वाहतूक आता वर्षभर सुरू राहणार असून "सागरमाला' प्रकल्पांर्तगत मांडवा येथे अत्याधुनिक रो-रो जेट्टीच्या कामाला सुरवात झाली आहे. येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. या अत्याधुनिक जेट्टीमध्ये 150 गाड्यांचे वाहतनळ आणि प्रवाशांकरिता गोल्फकार असेल.

गेट वे ते मांडवा हे सागरी अंतर तासाभराचे आहे. ही सेवा केवळ नऊ महिनेच सुरू असते. साधारणतः 12 लाख प्रवासी या सेवेचा लाभ घेतात. विशेषतः परदेशी पर्यटक हे मांडवा येथे जात असतात. पर्यटनाला चालना मिळावी, या हेतूने ही सुविधा वर्षभर सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने (एमएमबी) ने पुढाकार घेतला आहे. सागरमाला प्रकल्पांतर्गत मांडवा येथे "ब्रेक वॉटर'च्या कामाला सुरुवात केली आहे; तर भाऊचा धक्का ते मांडवा अशी रो-रो सुविधा सुरू होणार आहे. हे काम मार्च 2018 पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे रस्ते मुंबई-पनवेल मार्गावरील वाहतुकीवरचा भार कमी होण्यास मदत होईल. प्रकल्पाकरिता सुमारे 130 कोटी रुपये खर्च येणार आहे. रो-रो सेवेमुळे अलिबाग येथे पर्यटनाला चालना मिळेल. मांडवा येथे अद्ययावत टर्मिनस इमारत उभारली जाईल. टर्मिनल इमारतीप्रमाणे 150 वाहनांकरिता वाहनतळ असणार आहे. पर्यटकाच्या सुरक्षेकरिता जीवरक्षक, रुग्णवाहिका तैनात राहतील. विशेष म्हणजे मांडवा जेट्टीवर प्रवाशांकरिता गोल्फ कारची सुविधा असेल.

मुंबई महानगर प्रादेशिक विभाग (एमएमआर) तर्फे जलवाहतुकीचे जाळे वाढवत आहे. रो-रोमुळे वाहतुकीवरचा ताण कमी होईल. दोन वर्षांत राज्यात एमएमबीच्या माध्यमातून जलवाहतुकीचे रूप बदलले जाणार आहे.
- अतुल पाटणे, सीईओ, महाराष्ट्र सागरी मंडळ

Web Title: mumbai news transport effect on ro-ro service