खासदार राजू शेट्टी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 मे 2017

मुंबई - स्वाभीमानी शेतकरी संघटनेची आत्मक्‍लेश यात्रा मुंबईत दाखल झाल्यानंतर मानखुर्द येथे खासदार राजू शेट्टी यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.त्यानंतर पुन्हा त्यांनी ही यात्रा सुरु केली असून आज गोवंडी येथील श्रीकृष्ण हॉल मध्ये मुक्काम आहे.सोमवारी पुन्हा यात्रा सुरु होईल. 

पुणे येथील फुले वाड्यातून राजू शेट्टी यांनी 22 मे रोजी आत्मक्‍लेश यात्रा सुरु केली. रविवारी संध्याकाळी ही यात्रा मुंबईत दाखल झाली. मानखुर्दला पोहचल्यामुळे अचानक शेट्टी यांना त्रास होऊ लागला.उन्हात सतत पायी चालल्यामुळे त्यांच्या शरीरातील पाणी कमी झाले,पाय सुजले तसेच रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना दोन बाटल्या ग्लुकोज देण्यात आले आहे.त्यानंतर रात्री ते गोवंडी येथे मुक्कामी थांबले.सोमवारी सकाळी ही यात्रा पुन्हा सुरु होणार असून लालबाग येथे वस्तीला थांबणार आहे.त्यांची प्रकृती स्थीर असून तेही यात्रेत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: mumbai news treatment on raju shetty in private hospital