झाडे कापल्याबद्दल खुलाशाचे मेट्रोला निर्देश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

मुंबई - दक्षिण मुंबईतील "कुलाबा-सीप्झ मेट्रो-3' या प्रकल्पाच्या सबबीखाली अनावश्‍यक झाडे कापल्याच्या आरोपाबाबत खुलासा करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई मेट्रो रेल महामंडळाला दिले.

दक्षिण मुंबईतील कुणाल बिरवाडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुटीकालीन न्या. पी. डी. नाईक आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मेट्रो-3च्या प्रकल्पासाठी अनावश्‍यक असलेली काही झाडे महामंडळाने कोणतीही शहानिशा करता कापली आहेत, असा दावा याचिकादाराने केला आहे. त्यामुळे त्याला तूर्त स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली; मात्र खंडपीठाने ती अमान्य केली. याचिकेवरील पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार झाडे कापण्याचा प्रस्ताव आहे. उच्च न्यायालयाने यासाठी नुकतीच महामंडळाला सशर्त परवानगी दिली आहे.

Web Title: mumbai news tree cutting clarification order to metro