एकच लक्ष्य...एक लाख वृक्ष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

जागतिक तापमानवाढीला तोंड द्यायचे असेल तर पृथ्वीवरील वनांच्या क्षेत्रात वाढ करणे, हा एकमेव पर्याय आपल्या समोर आहे. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी असून यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेत श्रीमलंगगड परिसरातील मांगरूळ येथील ८५ एकर जागेवर १ लाख वृक्ष लावण्याचे सर्वतोपरी सुसज्ज आयोजन केले आहे.

डोंबिवली - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित महा वृक्षारोपण अभियानाची जय्यत तयारी मांगरुळ परिसरात सुरु असून, एकूण 15 हजार स्वयंसेवक व विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, महिला आणि नागरिकांचा  उत्स्फूर्त सहभाग आज (मंगळवार) होणार असलेल्या सामाजिक वृक्षारोपण मोहिमेत असणार आहे. ठाणे जिल्ह्याच्या इतिहासात हा उपक्रम विक्रमी ठरण्याची शक्यता आहे.

जागतिक तापमानवाढीला तोंड द्यायचे असेल तर पृथ्वीवरील वनांच्या क्षेत्रात वाढ करणे, हा एकमेव पर्याय आपल्या समोर आहे. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी असून यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेत श्रीमलंगगड परिसरातील मांगरूळ येथील ८५ एकर जागेवर १ लाख वृक्ष लावण्याचे सर्वतोपरी सुसज्ज आयोजन केले आहे. आहे. राज्यातील वनक्षेत्र वाढवण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाद्वारे महाराष्ट्र शासनाने या वर्षी राज्यभरात ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसहभागातून १ लाख वृक्ष लावण्याकरता पुढाकार घेतला आहे.

या महाअभियानासाठी 15 हजार स्वयंसेवक आणि 50 डॉक्टर आणि रुग्णवाहिकांसोबत, वैद्यकीय पथक सज्ज झाले आहे. लोकसहभागातून एक लाख झाडांचे रोपण करण्याचे शिवधनुष्य खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उचलले असून या अभियानात नानासाहेब धर्माधिकारी ट्रस्ट, रोटरी क्लब, रोटरॅक्ट क्लब, इनरव्हील, दिव्यज्योती ट्रस्ट आदी सामाजिक संस्था तसेच, कल्याण डोंबिवली आणि अंबरनाथ परिसरातील विविध शाळा, एनएसएसचे विद्यार्थी आणि शिक्षक, विविध संस्था, गणेश मंडळांचे कार्यकर्ते, महिला बचत गटातील महिला आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल आणि ज्ञानसाधना महाविद्यालयातील 650 विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून योगदान देणार आहेत.

या वृक्षारोपण महाभियानाचे नियोजन उत्तमरीतीने होण्यासाठी प्रत्येक संस्थेला, शाळेला त्यांचा परिसर आखून देण्यात आला आहे. या महाभियानाची तयारी जून महिन्यापासूनच सुरू करण्यात आली होती. मांगरूळ परिसरातील तीन डोंगरांवर वृक्ष लागवडीकरता खड्डे खणण्यात आले आहेत.प्रत्येक खाड्यात झाडे तयार ठेवण्यात आली आहेत. या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाचे सहकार्य लाभले असून वन विभागाकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वृक्षारोपणाच्या या महाभियानासाठी संपूर्ण मांगरूळ परिसर सज्ज झाला असून या उपक्रमात कोणतीही कसर राहू नये, यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक कामाचे तपशीलवार नियोजन करण्यात आले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा - 
शेतकरी कर्जमुक्तीची जिल्हानिहाय आकडेवारी
गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुलवामातील तिसऱ्या दहशतवाद्याचा खात्मा
मराठी तरुणांवर मध्य रेल्वेचा अन्याय; 432 युवक सेवेपासून वंचित​
विठूराया... शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय सुखी होणार नाही: मुख्यमंत्री फडणवीस​
GST च्या पारदर्शकतेचा लाभ सर्वांना!​
क्रिकेट : विंडीजचे फिल सिमन्सही भारताच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक​
‘जीएसटी’बाबत सोशल मीडियावर अफवा​

 

Web Title: Mumbai news tree plantation in Kalyan Dombivali