'मेट्रो-3'साठी बोगदे खोदण्याचे काम वेगात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 डिसेंबर 2017

मुंबई - कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 प्रकल्पासाठी बोगदा खोदण्याचे काम वेगाने सुरू आहे. माहीम येथील नयानगर आणि आझाद मैदानात ही कामे सुरू असून, नयानगर येथील टीबीएम मशीनने नोव्हेंबरपासून सुमारे 50 मीटरचा बोगदा खोदला आहे. आझाद मैदानातून 18 मीटरपर्यंत बोगदा खोदण्यात कंत्राटदारांना यश आले आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमार्फत मेट्रो-3चे काम करण्यात येत आहे. हा मार्ग पूर्णपणे जमिनीखालचा असून, कामाला नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. नयानगरमधील बोगदा 50 मीटरपर्यंत खोदण्यात आला आहे. दुसऱ्या बोगद्याचे काम सात मीटरपर्यंत झाले आहे. हे काम याच महिन्यात सुरू झाले आहे. दोन्ही बोगदे दादरमधील "शिवसेना भवन'पर्यंत खोदण्यात येणार आहेत.

आझाद मैदान ते ग्रॅण्ट रोड या 4.5 किलोमीटर मार्गाचे काम 4 डिसेंबरला सुरू झाले. यासाठी 18 मीटरपर्यंत बोगदा खोदण्यात आला आहे. बोगदा खोदण्याची कामे दोन वर्षे चालतील.

Web Title: mumbai news tunnel work speed for metro 3