दोन पर्यायी प्रश्नसंच 2019 मध्ये सुरू होणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 डिसेंबर 2017

मुंबई - राष्ट्रीय सामायिक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी यंदा अकरावी व बारावीच्या प्रश्नपत्रिका संचामध्ये केलेला बदलाबाबत शिक्षण विभाग पुन्हा विचार करत आहे. पेपर सोडवताना प्रश्नांना पर्याय नसल्याने; तसेच विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची भीती असल्याने या पद्धतींवर पुन्हा विचार करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे.

नीट, जेईई या राष्ट्रीय सामायिक परीक्षांसाठी तयारी करताना राज्यातील मुलांना बोर्डातील अभ्यासक्रम; तसेच परीक्षांचा अनुभव कामी यावा, म्हणून पर्यायी प्रश्न ही पद्धती प्रश्नपत्रिकांमधून बंद केली गेली. मात्र या पद्धतीमुळे, अकरावीच्या निकालात विद्यार्थी डगमगत असल्याचे समोर आले. यामागील तथ्य जाणून घेण्यासाठी आपण स्वतःहून बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी बोलणी केली. त्या वेळी त्यांनी सहामाही परीक्षांचा निकाल घसरला नसल्याचे स्पष्ट केले. तरीही सामान्य विद्यार्थ्यांचा विचार करत बोर्डातील मंडळांशी; तसेच शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा करून पर्यायी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्याव्यात, असे आपण सूचवल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

याबाबत अंतिम निर्णय बोर्डातील सदस्यांकडून होईल. निर्णय सकारात्मक पातळीवर झाल्यास पर्यायी प्रश्नपत्रिका संच 2019 पासून अमलात येईल, असेही तावडे यांनी सांगितले.

Web Title: mumbai news Two alternative questions will be started in 2019