फेरीवाल्यांच्या हल्ल्यात पिता-पुत्राचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

मुंबई - येथे पाच फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्यात पिता-पुत्राचा मृत्यू झाला असून एक मुलगा जखमी झाला आहे. गुलाम अली (55) आणि शाहबाज अली (25) या पिता-पुत्रांनी घरासमोर व्यवसाय करण्यास विरोध केल्याने फेरीवाल्यांनी हा हल्ला केला. वादादरम्यान पाच फेरीवाल्यांनी अली आणि शाहबाज यांच्यावर बांबू आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेला अली यांचा धाकटा मुलगा शाहदाब याच्यावरही फेरीवाल्यांनी हल्ला केला.
Web Title: mumbai news two death in hawkers attack