प्रयोगशील संतूरवादक उल्हास बापट यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

मुंबई - अभिजात संगीतातील तंतुवाद्याचे महत्त्व अधोरेखित करणारे प्रयोगशील संतूरवादक पंडित उल्हास बापट (वय ६७) यांचे गुरुवारी दुपारी २.२० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्यापश्‍चात त्यांची पत्नी, मुलगी, मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे. 

पंडित बापट अनेक महिन्यांपासून आजारी होते. प्रकृती बरी नसल्यामुळे जमशेदपूर येथील संतूरवादनाच्या कार्यक्रमाला त्यांनी जाऊ नये, असे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमासाठी त्यांनी पूर्वीच होकार दिला होता. त्यामुळे दिलेला शब्द पाळण्यासाठी ते कार्यक्रमाला गेले. तेथेच त्यांची प्रकृती खालावली. हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. बापट यांच्या निधनाची बातमी कळताच संगीत क्षेत्रातील अनेकांनी बापट यांच्या कांचनगंगा या निवासस्थानी पार्थिवाचे दर्शन घेतले. पंडित बापट यांच्यावर रात्री दादर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: mumbai news Ulhas Bapat passed away