उल्हासनगरमध्ये पेट्रोल चोरीचा झोल उघड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

एकीकडे पोलिसांचे भरारी पथके ठाणे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर धाडी टाकत असतानाच, दुसरीकडे मात्र मुजोर पेट्रोल पंप चालक नागरिकांना राजरोसपणे लुटत असल्याचे प्रमाण या घटनेवरून दिसू लागले आहे.

उल्हासनगर - पेट्रोल मोजण्याच्या यंत्रणेत फेरफार करून 12 लिटरच्या टाकीत 13.25 लिटर पेट्रोल टाकण्याचा आणि तसे बिल देण्याचा पेट्रोल चोरीचा झोल उल्हासनगरात उघड झाला आहे.एका जागरूक तरुणाने हा झोड उघड केल्याने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात फसवेगिरीचा,यंत्रणेत फेरफारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकीकडे पोलिसांचे भरारी पथके ठाणे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर धाडी टाकत असतानाच, दुसरीकडे मात्र मुजोर पेट्रोल पंप चालक नागरिकांना राजरोसपणे लुटत असल्याचे प्रमाण या घटनेवरून दिसू लागले आहे.

अजिंक्य पाटिल हा तरुण दररोज अम्बरनाथ ते कल्याण असा बाईकने प्रवास करतो.तो पेट्रोल संपल्यावर बऱ्याचदा विठ्ठलवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दितील श्रीराम चौका जवळील में शांता सर्विस सेंटर च्या पेट्रोल पंप वर पेट्रोल भरत असतो.काल अजिंक्यची दुचाकी रिजर्व लागल्याने त्याने सदर पेट्रोल पंपावर सुरुवातीला 500 रूपयांचे पेट्रोल भरले.त्यावेळी त्याच्या लक्षात आले की पेट्रोल कमी आहे.म्हणून त्याने पेट्रोलची टाकी फूल करण्यास सांगितले. मात्र अजिंक्यने दोन्ही बिल एकत्रित करून पाहिल्यावर  त्याला धक्काच  बसला. कारण त्याच्या  दुचाकी  च्या पेट्रोल च्या टाकीची क्षमता हि 12 लीटरची आहे.मात्र  साडे तेरा लिटर चे बिल पेट्रोल पंप चालकाने अजिंक्य कडून घेतले .विशेष म्हणजे गाड़ी रिज़र्वला असल्याने गाडीत कमीत कमी एक ते दीड लीटर पेट्रोल शिल्लक होते.

मोजमापाच्या यंत्रणेत फेरफार करण्यात आल्याची खात्री होताच, अजिंक्यने विठ्ठलवाडी पोलिसांना खबर केली.आणि पेट्रोल पंप वर पोलिसांच्या समोर पेट्रोल पंपच्या कर्मचाऱ्याने दुचाकी मधील पेट्रोल काढून मोजले तर ते केवळ 12 लीटर 10 मिली इतकेच भरले. म्हणजे सुमारे 2 ते 2.5 लीटर पेट्रोल चोरीचा झोल पेट्रोल पंपने केल्याचे उघड़ झाले.पोलिसांनी पेट्रोल मोजमापाची जप्त केली आहे. पेट्रोल पंप मॅनेजर विजय याच्यावर फसवणुकीचा,फेरफारीचा गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी भारत पेट्रोलियम ला सुद्धा याबाबत कल्पना दिली असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे हवालदार जालिंदर राठोड करत आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
आजीबाईंना भेटला जिल्ह्याधिकाऱ्यांच्या रूपात श्रावण बाळ !​
भारतातील चिनी नागरिकांना चीनकडून "सावधगिरीचा इशारा'
येरवडा कारागृहात कैद्यानेच केला कैद्याचा खून​
नितेश राणेंचे आंदोलन म्हणजे केवळ फालतूपणा: विनायक राऊत​
सावंतवाडीत सापडली लाल भडक नानेटी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली पाच फूटांची मगर
कोणी न्याय देता का न्याय', वृद्ध दांपत्याची आर्त हाक​
गोंदिया: गोरेगाव तालुक्‍यातील 17 गावात महिलांना मिळणार सरपंच होण्याची संधी​
तरुणाईच्या कंडिशन्स (नवा चित्रपट : कंडिशन्स अप्लाय...अटी लागू )​
नात्यांचं भावनिक हृदयांतर (नवा  चित्रपट : हृदयांतर )​
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्वाचा भारतीय महिलांचा पूर्ण निर्धार​
नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी यांचे निधन​
शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे सहा वर्षाचा विद्यार्थी शाळेतील वर्गखोलीत तीन तास बंद​
तब्बल 42 वर्षानंतर भारताला सुवर्ण​

Web Title: mumbai news Ulhasnagar, petrol fraud