उल्हासनगरात डीपीविरोधात शिवसेनेने कंबर कसली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

उल्हासनगर - शिवसेनेने उल्हासनगरचा विनाश करणाऱ्या डीपीविरोधात कंबर कसली आहे. भव्य मोर्चा काढून त्यांनी याचा बिगुल वाजवला असून, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आमदार कॅबिनेटमध्ये आवाज उचलणार आहेत. शिवसेना आधारस्तंभाची भूमिका निभावताना कोणत्याही व्यापाऱ्याला उद्‌ध्वस्त होऊ देणार नाही, असे आश्‍वासन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी (ता.1) रात्री उशिरापर्यंत येथे घेतलेल्या व्यापाऱ्यांसोबतच्या पाच बैठकांमध्ये दिले. 

शिवसेना व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश तेजवानी यांच्या पुढाकाराने गाऊन बाबाज आणि जीन्स बाजार कॅम्प नंबर 5, जापानी बाजार कॅम्प नंबर 2, शिवशंकर शिवाजी चौक ते स्थानक रोड बाजार असोसिएशन कॅम्प नंबर 3, मेन बाजार कॅम्प नंबर 4 येथे व्यापारी, दुकानदार यांच्यासोबत बैठका घेतल्या. कल्याण उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आमदार डॉ. बालाजी किणीकर, विरोधी पक्षनेता धनंजय बोडारे, नगरसेवक राजेंद्रसिंग भुल्लर, उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड, किरण सोनावणे, सोनी भाटिया, पी. एस. आहुजा, दीपेश हसीजा, लाल गुरनानी, लाल पिंजानी, भारत आहुजा, शशिकांत दायमा, समाजसेवी संस्थांचे सदस्य या वेळी उपस्थित होते. 

आमच्या पूर्वजांनी जो व्यापार शून्यातून निर्माण केला आहे, त्यावरच डीपीमुळे संक्रात ओढवली आहे, अशी खंत व्यापाऱ्यांनी या वेळी व्यक्त केली. व्यापार हीच उल्हासनगरची ओळख असून, ती कदापिही पुसली जाणार नाही, अशी ग्वाही डॉ. शिंदे यांनी व्यापाऱ्यांना दिली. 

Web Title: mumbai news ulhasnagar shiv sena