विद्यापीठ स्थापनेचा वाद निकाली काढण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

मुंबई - राज्यस्तरीय विधी विद्यापीठाच्या स्थापनेचा वाद येत्या चार आठवड्यांत निकाली काढण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज सरकारला दिले. विद्यापीठाच्या निर्मितीचा सरकारचा निर्णय मागील चार वर्षांपासून प्रलंबित आहे. विद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश, शुल्क आदी तक्रारींवर प्राथमिक सुनावणी घेण्यासाठी विद्यापीठ आयोगाची निर्मिती करण्यात येणार आहे. गोराई आणि गोरेगाव येथे भूखंड पाहिल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली. मात्र, गोराईची जागा विमानतळ प्राधिकरणाला, तर गोरेगावमधील जागेबाबत उंचीचा वाद आहे, असेही सांगण्यात आले. सरकारने चार वर्षांपूर्वी आयोग स्थापनेचा निर्णय जाहीर केला होता. मात्र त्याबाबत अद्याप कार्यवाही केलेली नाही, असे याचिकादारांचे म्हणणे आहे.
Web Title: mumbai news university dispute result high court