मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदावर डॉ दिगंबर नेटके

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

गेल्या तीन महिन्यांपासून यशवंतराव चव्हाण मूक्त विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ अर्जुन घाटुळे यांच्याकडे अतिरिक्त भार आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक बदलले जाणार असल्यांच्या चर्चांना उधाण आले होते.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदावर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे डॉ दिगंबर नेटके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निकाली गोंधळ सुरू झाल्यापासून मुंबई विद्यापीठाला टिकेपासून वाचवण्यासाठी मुंबईबाहेरील ही तिसरी नियुक्ती आहे. 

गेल्या तीन महिन्यांपासून यशवंतराव चव्हाण मूक्त विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ अर्जुन घाटुळे यांच्याकडे अतिरिक्त भार आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक बदलले जाणार असल्यांच्या चर्चांना उधाण आले होते. त्यात सोमवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राजभवनातून नियुक्तीचे पत्र आले. यात डॉ दिगंबर नेटके यांना मुंबई विद्यापीठात बोलावणे आल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र डॉ नेटके यांना हा अतिरिक्त भार आहे का त्यांना डॉ घाटुळे यांना मदत म्हणून बोलावले आहे हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

अगोदरच डॉ अर्जुन घाटुळे यांच्या मदतीला सोलापूर  विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकाला मदतीस बोलावण्यात आले आहे.

कुलगुरू निवडीसाठीच्या शोध समितिवर खंत 
मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शिफारशीनुसार करावी या मागणीचे माजी प्र कुलगुरू डॉ ए डी सावंत यांनी केली आहे. यासाठी त्यांनी खास राज्यपालांना निवेदन दिले आहे. मात्र नव्या कुलगुरूच्या निवडीसाठी स्थापन केलेल्या समितिबाबत त्यांनी खंत व्यक्त केली आहे. शोध समितीमध्ये सक्षम अधिकारी नसल्याची खंत त्यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.

Web Title: Mumbai news university of mumbai