छोट्या-छोट्या गोष्टींवरुन तू-तू, मै-मै; पोस्ट कोविडमध्ये वाढले कौटुंबिक वाद

छोट्या-छोट्या गोष्टींवरुन तू-तू, मै-मै; पोस्ट कोविडमध्ये वाढले कौटुंबिक वाद

मुंबई : कोरोना महामारीमुळे देशभरात गेल्या 10 महिन्यांपासून अनेक ठिकाणी अजूनही लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर कुटुंब चार भिंतीत एकत्र आली. यामुळे अनेक कुटुंबाचा स्नेह वृद्धिंगत झाला तर, काही कुटुंबांमध्ये कलहाची ठिणगीदेखील पडली. आपुलकीचा ओलावा कमी आणि  वावविवाद जास्त असे चित्र बघायला मिळाले. अश्यातच काही कंपन्यांनी लोकांना घरी राहून म्हणजेच वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. मात्र, घरी बसलेल्या प्रत्येकाच्या डोक्याला ताप झाला आहे. मानसोपचार तज्ञांच्या म्हणण्यानुसार, मुंबईच्या कुटुंबातील प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये चिडचिडेपणा वाढल्यामुळे घरात कलहाचे वातावरण निर्माण होण्याचे प्रमाण वाढले असल्याची चिंता मानसोपचारतज्ज्ञ व्यक्त करतात.

लॉकडाऊनमध्ये सतत तासंतास घरी राहिल्यामुळे लोकांच्या डोक्यावर गंभीर परिणाम  झालेला दिसून येत आहे. शिवाय, या परिस्थितीत अनेकांनी आपला जॉब गमावण्याच्या कारणामूळे ही अनेक जण मानसिक तणावाखाली आहेत. त्याचबरोबर, कुटुंबात सर्व सतत एकत्र राहिल्याने न पटण्याच्या कारणावरुन घरात वाद होण्याचे प्रमाण ही वाढले आहे. स्वतः चा पर्सनल वेळ मिळत नसल्याने ही लोकांमध्ये चिडचिड वाढली आहे. कोरोनाची भीती त्यात जॉब गेल्याचा ताण यातून अनेक कुटुंबात कलह होत असल्याचे मानसोपचार तज्ञ सांगतात. छोट्या-छोट्या कारणावरुन चिडचिड करुन मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.  

उदाहरण देताना मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर यांनी सांगितले की, त्यांना येणाऱ्या बऱ्याचशा कॉल्समध्ये सतत एकमेकांच्या समोर असल्यामुळे कौटुंबिक वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलाचा जॉब गेला म्हणून मुलगा सतत ऑनलाईन जॉब शोधत होता. पण, आईला वाटत होते की मुलगा लॅपटॉपवर खेळत बसला आहे. अशा आशयाची कारणे देत मुलगा आणि आई गेल्या दोन आठवड्यांपासुन भांडण करत असल्याचे उदाहरण डॉ. पारकर यांनी दिले.

एकमेकांबाबतच्या तक्रारी वाढल्या -

ज्यांना सतत घरी बसण्याची सवय नसते, जे कायम स्वत: च्या कामात व्यस्त असतात अशी माणसं एका क्षणात घरी बसून काम करायला लागले. पूर्वी प्रत्येक जण आपआपल्या काम व्यस्त होता. घरी प्रत्येकाच्या कौटुंबिक वाद असतो, काही गोष्टी पटत नाहीत, पण, घरी नसल्यामुळे त्या वादाला तितकासा वाव मिळत नाही. किंवा वाद झालाच तरी तो कमी प्रमाणात व्हायचा. कारण, लोक आपआपल्या कामात व्यस्त होते.मात्र, लॉकडाऊनमुळे पूर्ण दिवस एकमेकांच्या समोर असल्यामुळे आमने-सामने होऊन छोट्या-छोट्या गोष्टींवरुन तू-तू मै मै व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे, जे वाद आधीपासून होते. ते नव्याने समोर यायला सुरुवात झाली. आणि एकमेकांबाबतच्या तक्रारी वाढायला सुरूवात झाली. सासू-सून दोघंही एकत्र घरी असल्याने सतत एकमेकांच्या समोर असल्याने मनावर दबाव आल्यासारखे वाटायला लागतं. त्यातूनही भांडणे व्हायला सुरुवात होते. असे ही डॉ. पारकर यांनी सांगितले.

चिडचिड आणि न पटण्यातून वाद -

काय करावं ? आणि काय करु नये हे देखील सतत सांगितले जाते. त्यातून स्वत: च्या स्वातंत्र्यावर गदा आल्याचे लोकांना वाटते. सतत हात धुणे यावरुनही लोकं हल्ली चिडचिड करायला लागले आहेत. दिवसाला किमान तीन ते चार कुटुंबातून अशाप्रकारे फोन कॉल्स मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी येतात. मानसिक आजार हा कोविडपेक्षा जास्त भयंकर आजार आहे. कोविडचा परिणाम नुसताच शरीरावर झालेला नाही तो मनावर, कामावर, नात्यांवर जास्त प्रमाणात झाला आहे. काहींना आपले मानसिक खच्चीकरण झाल्यासारखे वाटते. पण, या सर्वातून बाहेर पडणे गरजेचे आहे. जर एखाद्या व्यक्तीशी सतत वाद होत असतील तर बोलून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.- डॉ. शुभांगी पारकर, मानसोपचार तज्ञ. 

mumbai news unmasking happiness family disputes escalated in Post Covid

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com