'मेस्मा'वरून विधानसभेत गदारोळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

मुंबई - अंगणवाडी सेविकांना लावलेला जाचक "मेस्मा' कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी सत्ताधारी शिवसेनेसह विरोधकांनी सरकारला बुधवारी विधानसभेत चांगलेच फैलावर घेतले. "मेस्मा कायदा रद्द झालाच पाहिजे,' अशी घोषणाबाजी करत शिवसेनेचे आमदार अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत उतरले. शिवसेनेच्या ज्ञानराज चौगुले यांनी अध्यक्षांसमोरील राजदंडही उचलला. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांना समज दिली तेव्हा चौगुले यांनी राजदंड परत जागेवर ठेवून दिला. शिवसेना आमदारांच्या गदारोळामुळे कामकाज आठ वेळा स्थगित करावे लागले.
Web Title: mumbai news vidhansabha confussion on mesma