अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर विरोधकांत खलबते

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

मुंबई - येत्या 26 फेब्रुवारी 2018 पासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्षांत खलबते सुरू झाली आहेत.

विधिमंडळातील विरोधी पक्षाच्या गटनेत्यांची बैठक आज सायंकाळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विखे पाटील यांच्या कार्यालयात झाली. या वेळी प्रामुख्याने अर्थसंकल्पी अधिवेशनातील रणनीतीबाबत चर्चा झाली.

सर्व गटनेत्यांची पुढील बैठक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी होणार आहे. आजच्या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील, कपिल पाटील, डाव्या आघाडीचे जिवा गावित, कॉंग्रेसचे भाई जगताप, संजय दत्त उपस्थित होते.

Web Title: mumbai news vidhimandal session radhakrishna vikhe patil