विकास समुद्रे रुग्णालयात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

मुंबई - ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे "फू बाई फू' फेम अभिनेता विकास समुद्रे याला मीरा रोड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विकासवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. विकासला काही दिवसांपासून डोकेदुखीचा त्रास होत होता. हा त्रास वाढल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. विकासवर उपचार करता यावेत, यासाठी विविध संस्था आणि नाट्य व चित्रपटसृष्टीतील व्यक्तींनी मदतीकरिता पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title: mumbai news vikas samudre in hospital