विक्रोळीमध्ये प्रथम विद्यार्थी दिन उत्साहात साजरा

अक्षय गायकवाड
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

डॉ. बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आदी नैतिक मूल्यांची जोपासना केली. त्यांची शिकवण विद्यार्थ्यांच्या अंगी रुजावी यासाठी या दिनाचे औचित्य साधून उपक्रम राबविले गेले. तसेच महापुरुषांची माहिती त्यांचे कार्य विद्यार्थ्यापर्यंत पोचले पाहिजे. विद्यार्थी दिन हा उशिरा सुरु याची खंत वाटते. रोझ डे, चॉकलेट डे, यापेक्षा महापुरुषांची महिती देणारे दिवस साजरी केले गेले पाहिजे.
- दीपा परब, मुख्याध्यापिका, प्राथमिक विभाग मराठी, विकास हायस्कूल

विक्रोळी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम शाळेच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले, तो ७ नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून मंगळवारी साजरा करण्यात आला. या दिवशी विक्रोळीतील शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले. टागोरनगर येथील पालिका शाळेत चॉकलेट वाटण्यात आले. विकास हायस्कूल मराठी प्राथमिक विभागाने हा दिवस उत्सहात साजरी केला.

साताऱ्यातील राजवाडा चौकातील प्रतापसिंग शाळेमध्ये ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेबांना दाखल करण्यात आले. शाळेत दाखल करताना त्यांचे नाव भिवा, असे नोंदविण्यात आले आहे. प्रतापसिंग शाळेच्या दाखल रजिस्टरच्या १९१४ क्रमांकासमोर बालभिवाची स्वाक्षरी आहे. संबंधित प्रशासनाने हा ऐतिहासिक ठेवा आजही जतन करून ठेवला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: शिकले आणि खऱ्या अर्थाने देशाला शैक्षणिक क्रांती व युगांतराची चाहुल लागली. पुढे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी बाबासाहेबांचे योगदान बहुमोल ठरले अशी विविध माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. निबंध स्पर्धेत १०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. तर वक्तृत्व स्पर्धेत ८० मुलांनी भाग घेतला. या निबंध, वक्तृत्व स्पर्धेतून ८ विध्यार्थ्यांना गौरवण्यात येईल. लहानग्यांनी ही विद्यार्थी दिवस म्हणजे आपला दिवस समजत हा दिन उत्सहाने साजरी केला. चौथीतील विद्यार्थी संजित दळवी यांनी चवदार तळ्याचे पाणी हि कविता यावेळी सादर केली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: mumbai news vikroli dr babasaheb ambedkar student day