विश्‍वास पाटील यांच्यावर चौकशी समितीचा ठपका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

मुंबई - झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वास पाटील यांनी सेवानिवृत्तीपूर्वी काही दिवसांत मंजूर केलेल्या फायलींची चौकशी करणाऱ्या समितीने आपला अहवाल गृहनिर्माण खात्याला पाठवला आहे. या फायलींच्या 139 पैकी 33 प्रकरणांत अनियमितता असल्याचा ठपका या समितीने ठेवला आहे.

पाटील यांनी सेवानिवृत्तीपूर्वी काही दिवसांत मंजूर केलेल्या प्रकरणांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने या प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांच्या अध्यक्षतेखाली निवृत्त न्यायाधीशांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीतील एक सदस्य कामानिमित्त विदेशात गेल्याने चौकशी रखडली होती. या समितीने चौकशी अहवाल तयार केला आहे. तो गृहनिर्माण खात्याकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची शिफारस या समितीने केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी कपूर यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Web Title: mumbai news vishwas patil inquiry committee