ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर डब्ल्यू. बी. राव यांचे निधन

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 जानेवारी 2018

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर डब्ल्यू. बी. राव यांचे बुधवारी (ता. 16) सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर भारतीय आरोग्य निधी या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अनेक गाजलेल्या चित्रपटांचे त्यांनी छायालेखन केले होते.

राव यांनी 1960मध्ये तंत्रज्ञ म्हणून कारकिर्दीला सुरवात केली. काही काळ त्यांनी दिग्दर्शक विक्रम भट यांचे वडील प्रवीण भट यांच्याकडे सहायक म्हणून काम केले. त्यानंतर स्वतंत्रपणे सिनेमॅटोग्राफी करायला सुरवात केली. "हम', "खुदा गवाह', "धडकन', "रंगीला', "जुडवा', "हर दिल जो प्यार करेगा', "अफसाना प्यार का', "बरसात की रात', "इन्साफ' आदी गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी सिनेमॅटोग्राफी केली होती.

Web Title: mumbai news w b rao death