कळव्यात घराची भिंत कोसळून तीन जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

ठाण्यातील कळवा परिसरातील पारसिक डोंगर उतरावर घोलाईनगर परिसरात चाळींचे साम्राज्या असून त्यापैकी छोटेलाल जैसवाल यांच्या मालकिच्या घराची भिंत खालच्या भागात असलेल्या रायसाहेब पाठक यांच्या घराच्या छतावर कोसळले.

ठाणे : ठाण्यातील कळवा परिसरातील घोलाईनगर भागामध्ये एका घराची भिंत कोसळून तीन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. 

सकाळी अकरा वाजता ही घटना घडली असून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन जखमींना उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये उर्मिला पाठक (50),शिल्पा पाठक (18) आणि सुरेश पाठक (12) या तिघांचा समावेश आहे.

ठाण्यातील कळवा परिसरातील पारसिक डोंगर उतरावर घोलाईनगर परिसरात चाळींचे साम्राज्या असून त्यापैकी छोटेलाल जैसवाल यांच्या मालकिच्या घराची भिंत खालच्या भागात असलेल्या रायसाहेब पाठक यांच्या घराच्या छतावर कोसळले. सकाळी अकरा वाजता घडलेल्या या घटने प्रसंगी घरामध्ये असलेले तीघेजण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन जखमींना महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. तर येथील आणखी एक धोकादायक इमारत पथकाने तोडून टाकली. जखमींपैकी उर्मिला यांना किरकोळ जखम झाली आहे. तर शिल्पा पाठक हिच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. तर सुरेश पाठक याच्या डोके, हात आणि पायाला दुखापत झाली आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने देण्यात येणात आली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
सरपंच आता थेट लोकांमधून निवडणार
औरंगाबाद: दारुमुक्तीसाठी रणरागिणी एकवटल्या, फोडल्या बाटल्या
भाजपला मते देवून सांगली जिल्ह्याचा विकास खुंटला: अजित पवार
ट्रम्प मूर्ख; काश्‍मीर संघर्ष थांबणार नाही: सईद सलाहुद्दीन​
सदाभाऊ हाजिर व्हा; स्वाभिमानीची नोटीस​
या परिस्थितीला काँग्रेस जबाबदार- नितीश कुमार​
पेट्रोलपंप चालकांचा 12 जुलैला देशव्यापी संप
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांची दादागिरी​
चांगला कर साधासरळ ठरावा!​
#स्पर्धापरीक्षा - आय एन एस तिहायु​
भारताचा विंडीजकडून 11 धावांनी पराभव​
प्रणवदांनी वडिलांसारखी काळजी घेतली : मोदी​
चीनबरोबरील वाद: सिक्कीममध्ये लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या​

Web Title: Mumbai news wall collapse in kalwa