माझगावमधील 30 वर्षांचा पाणी प्रश्‍न सुटला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई - माझगावमधील लवलेन या भागात तीस वर्षांपासून पाणीसमस्या होती. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे हजारो स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत होता. या भागातील रस्त्यालगतच्या दोन जलवाहिन्या जोडण्याचे काम ऐन पावसाळ्यात जलअभियंता विभागाने केल्याने पुरेशा दाबाने या परिसरात पाणीपुरवठा होऊन 30 वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्‍न अखेर सुटला. नगरसेविका सोनम जामसूतकर यांच्या पाठपुराव्याने हे काम मार्गी लागल्याने स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

प्रभाग क्रमांक 210 मध्ये माझगाव, लवलेन, हातीबाग, मुस्तफा बाजार, बीआयटी चाळी या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रचंड तुटवडा होता. तीस वर्षांपासून पाण्याची ही समस्या होती. वारंवार तक्रारी करूनही येथील पाणी प्रश्‍न सुटत नव्हता. कमी दाबाने फक्त 15 मिनिटे पाणीपुरवठा होत होता. तीस वर्षांतील प्रत्येक निवडणुकीत या भागातील पाणी प्रश्‍न नेहमीच प्रचाराचा मुद्दा राहिला. नगरसेविका जामसूतकर यांनीही हा प्रश्‍न सोडविण्याचे वचन मतदारांना दिले होते. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने त्यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता; तसेच जलअभियंता खात्याशी सातत्याने पाठपुरावा केला. पालिकेचे सहायक आयुक्त किशोर देसाई, जलअभियंता अशोककुमार तवाडिया यांच्याशी बैठका घेऊन कामाला सुरुवात केली. कामे वेगाने करण्यात आल्याने या भागातील पाणी प्रश्‍न मिटला आहे. आता पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होऊ लागला आहे. नगरसेविका जामसूतकर यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. 

जलवाहिन्या जोडल्या 
ऐन पावसाळ्यात रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या 12 आणि 18 इंचाच्या दोन जलवाहिन्यांचे काम करण्यात आले. या दोन्ही जलवाहिन्या जोडण्यात आल्या. जलकामे विभागाचे सहायक अभियंता विराज जाधव यांच्या पथकाने ही कामे वेगाने केली.

Web Title: mumbai news water