पश्‍चिम, मध्य रेल्वेच्या थर्टीफर्स्टला विशेष लोकल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

मुंबई - सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचा परतीचा प्रवास सुकर व्हावा यासाठी पश्‍चिम आणि मध्य रेल्वे 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत विशेष लोकल चालवणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल मार्गावर चार विशेष लोकल; तर पश्‍चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते विरारदरम्यान आठ विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत.

सीएसएमटी-कल्याण लोकल मध्यरात्री 1.30 वाजता सुटेल. कल्याणहून सीएसएमटीकडे येणारी लोकल मध्यरात्री 1.30 वाजता सुटेल. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल डाऊन दिशेला मध्यरात्री 1.30 वाजता एक गाडी सुटेल आणि पनवेलला 2.50 वाजता पोहोचेल. पनवेल ते सीएसएमटी लोकल मध्यरात्री 1.30 ला सुटेल आणि सीएसएमटीला पहाटे 2.50 वाजता पोहोचेल. पश्‍चिम रेल्वे मार्गावर विरार ते चर्चगेट अप मार्गावर चार आणि चर्चगेट ते विरार डाऊन मार्गावर चार अशा एकूण आठ फेऱ्या चालवण्यात येतील.

पश्‍चिम रेल्वे
चर्चगेट विरार ही लोकल रात्री 1.15 वाजता सुटेल. विरार ते चर्चगेट लोकल 12.15 वा. सुटेल. चर्चगेट-विरार येथून रात्री 2 वाजता विरार लोकल सुटेल. विरारहून रात्री 12.45 वाजता लोकल सुटेल. चर्चगेट- विरार लोकल पहाटे 2.30 सुटेल. विरार-चर्चगेट लोकल रात्री 1.40 ला सुटेल. चर्चगेट विरार लोकल पहाटे 3 वाजून 25 मिनिटांनी सुटेल. विरार-चर्चगेट लोकल रात्री 3.25 वाजता सुटेल.

Web Title: mumbai news western central railway thirty first special local