वेग नियंत्रकाची सक्ती टॅक्‍सीचालकांना कशासाठी?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

मुंबई - सध्या मुंबईतील वाहतूक व्यवस्थेनुसार जास्तीत जास्त ताशी 50 किलोमीटर वेगाने टॅक्‍सी चालवली जाते. राज्य सरकार ताशी 80 किलोमीटरच्या वेग नियंत्रकाची सक्ती कशासाठी करत आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली.

टॅक्‍सींमध्ये वेग नियंत्रक लावण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका टॅक्‍सीचालक संघटनेने नुकतीच उच्च न्यायालयात केली आहे. त्यावरील सुनावणी सुटीकालीन न्या. पी. डी. नाईक आणि एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे झाली. राज्य सरकारच्या निर्णयानुसार 30 जूनपर्यंत टॅक्‍सीचालकांनी ताशी 80 किलोमीटरचे वेग नियंत्रक बसवण्याची सक्ती केली आहे; मात्र आजची शहर-उपनगरांतील वाहतूक व्यवस्था ताशी 50 किलोमीटरची आहे. अशा स्थितीत 80 किलोमीटरची सक्ती सरकार कशासाठी करत आहे, असे न्यायालयाने विचारले. वेग नियंत्रक न बसवलेल्या टॅक्‍सीचालकांना टॅक्‍सीचे फिटनेस प्रमाणपत्र देऊ नये, असे परिवहन आयुक्त कार्यालयाने परिपत्रकात स्पष्ट केले आहे. ताशी 80 किलोमीटरचे वेग नियंत्रक बसवण्याची सक्ती काळी-पिवळी टॅक्‍सीसह अन्य मोबाईल ऍप टॅक्‍सीचालकांनाही करण्यात आली आहे.

Web Title: mumbai news What is the speed controller forced taxi drivers?