व्हॉट्सअॅपवर अश्लील फोटो पाठवणारा महानिर्मिती अभियंता निलंबित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुंबई मुख्यालय सोडून जाऊ नये, असे निर्देशही खोकले यांना देण्यात आले आहेत. निलंबन कालावधीत त्यांच्या मूळ वेतनात 50 टक्के कपात करण्यात येणार आहे. 
 

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी तथा महानिर्मितीचे मुख्य अभियंता व्ही.एम. खोकले यांना व्हॉट्सअॅप ग्रूपवर अश्लील फोटो पोस्ट करणे चांगलेच महागात पडले आहे. महानिर्मितीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी या अभियंत्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. 

या मुख्य अभियंत्याने 14 जुलैच्या मध्यरात्री 'एनर्जी मिनिस्टर लाईव्ह' या नावाने असलेल्या व्हॉट्सअॅप ग्रूपवर एक अश्लील फोटो पोस्ट केला होता. त्याला अनुसरून व्ही.एम. खोकले यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. महानिर्मिती सेवाविनिमय 88 (क) आणि अनुसूची ग अन्वये दिलेल्या अधिकारांनुसार 15 जूलैपासून पुढील आदेश मिळेपर्यंतच्या तारखेपर्यंत निलंबित करण्यात येत असल्याचे अध्यक्ष श्रीमाळी यांनी स्पष्ट केले आहे. 

निलंबन कालावधीत कार्यकारी संचालकांच्या कार्यालयात दर सोमवारी हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुंबई मुख्यालय सोडून जाऊ नये, असे निर्देशही खोकले यांना देण्यात आले आहेत. निलंबन कालावधीत त्यांच्या मूळ वेतनात 50 टक्के कपात करण्यात येणार आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: mumbai news whatsapp porn photo mahanirmiti engineer suspended