व्हॉट्‌सऍप वाचविणार स्मार्ट फोनमधील जागा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

मुंबई -  व्हॉट्‌सऍपमध्ये येणाऱ्या फोटो, व्हिडीओंमुळे स्मार्ट फोनमधील भरपूर जागा वाया जात होती. खासकरून ऍपल वापरकर्त्यांना ही समस्या भेडसावत होती. त्यामुळे त्यांना आलेले फोटो, व्हिडीओंचे ग्रॅन्युलर स्टोरेजद्वारे व्यवस्थापन करण्यात आले होते. आता ही सुविधा अँड्रॉईड वापरकर्त्यांनाही मिळणार आहे. आपल्या स्मार्ट फोनमध्ये कोणत्या चॅटसाठी किती डेटा वापरण्यात आला, हेही पाहता येणार आहे. प्रत्येक मॅसेजची क्षमता किती याचे व्यवस्थापन या मॅनेजमेंटच्या निमित्ताने करता येईल. इमेज, लोकेशन, कॉन्टॅक्‍ट कार्ड, जीआयएफ, व्हिडीओ, ऑडीओ मॅसेज आणि डॉक्‍युमेंट याचेही डेटा व्यवस्थापन करणे शक्‍य आहे.

मुंबई -  व्हॉट्‌सऍपमध्ये येणाऱ्या फोटो, व्हिडीओंमुळे स्मार्ट फोनमधील भरपूर जागा वाया जात होती. खासकरून ऍपल वापरकर्त्यांना ही समस्या भेडसावत होती. त्यामुळे त्यांना आलेले फोटो, व्हिडीओंचे ग्रॅन्युलर स्टोरेजद्वारे व्यवस्थापन करण्यात आले होते. आता ही सुविधा अँड्रॉईड वापरकर्त्यांनाही मिळणार आहे. आपल्या स्मार्ट फोनमध्ये कोणत्या चॅटसाठी किती डेटा वापरण्यात आला, हेही पाहता येणार आहे. प्रत्येक मॅसेजची क्षमता किती याचे व्यवस्थापन या मॅनेजमेंटच्या निमित्ताने करता येईल. इमेज, लोकेशन, कॉन्टॅक्‍ट कार्ड, जीआयएफ, व्हिडीओ, ऑडीओ मॅसेज आणि डॉक्‍युमेंट याचेही डेटा व्यवस्थापन करणे शक्‍य आहे. मॅनेज मॅसेज पर्यायांतर्गत मॅसेज सिलेक्‍ट आणि डिलिट करण्याचाही पर्याय आहे. 

Web Title: mumbai news whatsapp smart phone