त्या पुलावरून उतरल्या आणि पुलाच्या पायऱ्या कोसळल्या

दिनेश चिलप मराठे
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

कुंभकर्णी निद्रेतील रेल्वे प्रशासनास जाग कधी येणार

मुंबई : शनिवार, दिनांक14 ऑक्टोबर... वेळ रात्री 8:30 वाजताची होती. मी चर्नीरोड रेल्वे पथब्रिज उतरून खाली आले आणि ब्रिजच्या पायऱ्या उतरत असताना थोड़ी हालचाल जाणवली, तेव्हड्यात ब्रिजच्या पाय-या कोसळल्या दैव बलवत्तर म्हणून मी वाचले. मोठा आवाज आल्याने मागे वळून पाहिले आणि माझा थरकाप उडाला,... अशा शब्दांत प्रचंड घाबरेलेल्या प्रत्यक्ष घटनेच्या साक्षीदार गिरगावच्या रहिवासी भावना पंकज वैद्य यांनी सकाळशी बोलताना आपला अनुभव कथन केला.

या अपघातात डूंगर सिंग नामक 73 वर्षीय वरिष्ठ नागरिक जख्मी झाले. त्यांना सैफ़ी हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांच्या हाताला मुका मार लागला आहे. मागील दीड वर्षांपासून "आम्ही गिरगांवकर टीम"ने चर्नी रोड ब्रिज लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्या अशी प्रत्यक्ष भेटून मागणी केली होती. परंतु त्यांना प्रशासनाकडून काही नीट उत्तर मिळालं नाही. म्हणून प्रशासनला जागवण्यासाठी आम्ही गिरगांवकर टीमने चर्नी रोड ब्रिजवर सादर करीत अनोखे आंदोलन केले होते.

राज ठाकरे यांच्या 5 ऑक्टोबर रोजी काढलेल्या संताप मोर्चाच्या संदर्भ देत मनसेचे मलबारहिल विभाग अध्यक्ष धनराज नाईक यांनी हा ब्रिज लवकरात लवकर बांधावा आणि लोकांच्या जीवनाशी खेळू नका. ब्रिज चांगल्या प्रतिचे बांधकाम साहित्य वापरून बांधावा. मुंबई महानगर पालिकेच्या अंतर्गत येणारा हा पूल टक्केवारी चा भ्रष्टाचार न करता बांधावा नाहीतर मनसे स्टाईलने आम्ही आंदोलन करू. काल मुंबईचे महापौर महाडेश्वर येऊन प्रत्यक्ष पाहणी करून गेले.

Web Title: mumbai news woman walks, pedestrian bridge collapses