पुरुष हवालदारासमोर अंगझडती घेतल्याने महिलेला जामीन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

मुंबई - मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पुरुष पोलिस हवालदारासमोरच महिला पोलिस हवालदाराने अंगझडती घेतल्याचा मुद्दा ग्राह्य मानत उच्च न्यायालयाने महिला आरोपीला जामीन मंजूर केला. "नार्कोटिक्‍स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स' (एडीपीएस) कायद्याचे उल्लंघन केल्याचा दावा मंजूर करत न्यायाधीश ए. एस. गडकरी यांनी हा निर्णय दिला.

ठाण्यातील विवियाना मॉल परिसरात एक महिला अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने तिला अटक केली. ही कारवाई 29 ऑगस्ट 2015 ला झाली होती. त्या वेळी घटनास्थळीच तिची अंगझडती घेण्यात आली होती. त्यात तिच्याकडे 430 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले होते; मात्र पुरुष पोलिस हवालदाराच्या उपस्थितीत अंगझडती घेण्यात आली, अशी तक्रार अटक केलेल्या महिलेने केली होती.

या मुद्याच्या आधारे अमली पदार्थ विरोधी विशेष सत्र न्यायालयात तिने जामिनासाठी अर्ज केला होता; मात्र तिचा अर्ज फेटाळण्यात आल्याने तिने उच्च न्यायालयात याचिका केली होती. केवळ संशयाच्या आधारावर एखाद्या महिलेची अंगझडती घेता येते, असा दावा सरकारी पक्षाने केला होता. अंगझडतीवेळी पोलिसांनी खबरदारी घेतली असली, तरी त्या वेळी पुरुष पोलिस हवालदार उपस्थित असल्याचे नाकारता येत नसल्याने कायद्याचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे संबंधित महिलेला जामीन मंजूर करत असल्याचे उच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केले.

Web Title: mumbai news women bell