'यात्रा ऑनलाइन' करणार अंजिठा लेण्यांचे संवर्धन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

मुंबई - केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वारसास्थळ दत्तक योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांचे संवर्धन करण्यासाठी "यात्रा ऑनलाइन प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

मुंबई - केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वारसास्थळ दत्तक योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांचे संवर्धन करण्यासाठी "यात्रा ऑनलाइन प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

या निवडीमुळे यात्रा ऑनलाइन कंपनी "स्मारक मित्र' म्हणून ओळखली जाणार आहे. ही कंपनी सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) अजिंठा लेण्यांच्या ठिकाणी पर्यटनपूरक सोयी-सुविधा पुरवणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या वर्षी 27 सप्टेंबरला वारसास्थळ दत्तक योजनेचे उद्‌घाटन करण्यात आले. या योजनेअंतर्गत देशातील 14 स्मारकांच्या विकासासाठी खासगी कंपन्यांना आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार देशभरातून 57 कंपन्यांचे अर्ज पर्यटन मंत्रालयाकडे आले होते. त्यापैकी सात कंपन्यांची निवड करण्यात आली.

या स्मारकांचे संवर्धन
जंतर-मंतर, कुतुबमिनार, सफदरजंग कबर, अग्रसेनची विहीर, पुराना किल्ला (दिल्ली), सूर्य मंदिर (कोणार्क), राजाराणी मंदिर (भुवनेश्वर), रतनगिरी स्मारक (ओडिशा), हंपी (कर्नाटक), लेह राजवाडा (जम्मू आणि काश्‍मीर), मत्तानचेरी राजवाडा संग्रहालय (कोची), गंगोत्री मंदिर आणि गौमुख येथील त्रिभुज प्रदेश (उत्तराखंड), स्टॉक कांगरी, लडाख (जम्मू आणि काश्‍मीर).

Web Title: mumbai news yatra online ajintha lene promotion