ओरियन मॉलमध्ये  स्वप्नीलची धमाल!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

तुर्भे -  ‘सकाळ माध्यम समूहा’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या ‘यिन’च्या मंत्रिमंडळ निवडणुकीनिमित्त, ‘कोण होणार यिनचा मुख्यमंत्री?’ या पोस्टरचे बुधवारी (ता. २६) अभिनेता स्वप्नील जोशी याच्या हस्ते अनावरण झाले. यावेळी महाविद्यालयीन तरुणांसोबत स्वप्नीलने धमाल केली. पनवेल येथील ओरियन मॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. ‘यिन’च्या मंत्रिमंडळ निवडणुकीचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. 

‘यिन’ आणि ओरियन मॉलच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आगामी ‘भिकारी’ चित्रपटातील अभिनेत्री रुचा इनामदार, निर्माते शरद शेलार, ओरियन मॉलचे चेअरमन मंगेश परुळेकर, मानसी परुळेकर, गगनगिरी पतसंस्थेचे अध्यक्ष रामदास शेवाळे, डी. डी. विसपुते महाविद्यालयाच्या अध्यक्ष संगीता विसपुते, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य संगीता ह्युरिवाल आदी मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी स्वप्नीलच्या हस्ते ‘कोण होणार यिनचा मुख्यमंत्री’ या पोस्टरचे अनावरण झाल्यानंतर तरुण-तरुणींनी टाळ्या वाजवून जल्लोष केला. प्रसिद्ध व्यंगचित्रकार व लेखक विवेक मेहेत्रे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना ‘चला यशस्वी होऊ या’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी स्वप्नीलने त्याच्या आगामी ‘भिकारी’ या मराठी चित्रपटाचे प्रमोशनही केले. तो म्हणाला, की खरा हिरो तुमच्यासारखी तरुणाईच आहे. मराठमोळ्या रसिकांमुळेच मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आई-वडिलांच्या आशीर्वादासह मेहनत आणि चांगुलपणाही गरजेचा आहे. अभिनेत्री रुचा हिनेही यावेळी तरुण-तरुणींशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. स्वप्नील आणि रुचासोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणांची झुंबड उडाली होती.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ‘यिन’च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. डी. डी. विसपुते महाविद्यालयाचे या कार्यक्रमासाठी सहकार्य मिळाले. 

‘सकाळ’ने तरुणांसाठी ‘यिन’च्या माध्यमातून चांगले व्यासपीठ उभे केले आहे. या उपक्रमात ओरियन मॉलला सहभागी करून घेतल्याबद्दल ‘सकाळ’चे आभार. स्वप्नील जोशीसारखा उत्तम अभिनेता मॉलमध्ये आल्याने खूप आनंद झाला. त्याच्या आगामी चित्रपटाबाबत  त्याला शुभेच्छा! 
- मंगेश परुळेकर, चेअरमन,  ओरियन मॉल, पनवेल.

Web Title: mumbai news YIN Panvel Swapnil Joshi