'मोजोस'चा मालक युग तुलीला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

मुंबई - कमला मिल कंपाउंड आग प्रकरणातील आरोपी आणि "मोजोस'चा मालक युग तुली पोलिसांना शरण आल्यानंतर मंगळवारी त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला 20 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मुंबई - कमला मिल कंपाउंड आग प्रकरणातील आरोपी आणि "मोजोस'चा मालक युग तुली पोलिसांना शरण आल्यानंतर मंगळवारी त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला 20 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

युग तुली आज सकाळी त्याच्या वकिलांसह पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली. दुपारी तीन वाजता त्याला भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. युग तुली 15 दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होता. तो अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या प्रयत्नात होता. "एमआरटीपी' कायद्यांतर्गत दाखल असलेल्या एका गुन्ह्याबाबत पोलिसांनी त्याचा यापूर्वीच जबाब नोंदवला होता.

Web Title: mumbai news yug tuli arrested