मुंबईतील 'नाईट कर्फ्यू'ला मुदतवाढ नाही; मुंबई पोलिसांचा निर्णय

मुंबईतील 'नाईट कर्फ्यू'ला मुदतवाढ नाही; मुंबई पोलिसांचा निर्णय

मुंबई - ब्रिटनमधील कोरोना व नववर्षाच्या होणारी संभाव्य गर्दी यांच्या पार्श्वभूमिवर मुंबईत जाहीर करण्यात आलेला संचारबंदीला बुधवारी मुदतवाढ देण्यात आलेली नाही. मंगळवारी यासंदर्भात राज्य सरकारकडून बुधवारी कुठलीही सूचना न आल्याने, मुंबई पोलिसांनी मुंबईतील संचारबंदी न वाढवण्याचा निर्णय मंगळवारी घेतला आहे.

खबरदारी म्हणून  या अगोदर रात्री 11 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत मुंबईत संचारबंदी होता. या संचारबंदीची 5 जानेवारीपर्यंत मुदत होती.  नाताळ व नववर्ष सुरुवातीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून महापालिका क्षेत्रात नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली होती. रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचारबंदी जारी करण्यात आली होती. याची मूदत 5 जानेवारी पर्यंतच होती. पण कोणतीही सूचना न मिळाल्यामुळे मुंबई पोलिसांनी मुंबईमधील संचारबंदीचा कालावधी न वाढवण्याचा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळे बुधवारीपासून मुंबईतील रात्रीची संचारबंदी संपलेली आहे.
ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर 21 डिसेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली होती. या बैठकीनंतर मुंबईत रात्रीची संचारबंदी जारी करण्यात आली होती.

Mumbai night curfew not extended Mumbai Police decision

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com