#FactCheck - मुंबई नाईट लाईफचा रियॅलिटी चेक...

#FactCheck - मुंबई नाईट लाईफचा रियॅलिटी चेक...

मुंबई : मुंबई 24 तास सुरु ठेवण्याच्या निर्णयाची अमंलबजावणी सुरु झाली असली तरी ग्राहकांचा प्रतिसाद नसल्याने मॉल्स वाल्यांचे रात्री दिडच्या आत घरात अशी परीस्थीती होती. तर, गिरगाव आणि जुहू या दोन्ही चौपाट्यांवर मध्यरात्री नंतर प्रवेश बंदी होती. मात्र,नरीमन पाईंटला पहाटे पर्यंत नागरीक होते. जमा खर्चाच्या हिशोबाचा ताळमेळ घालत मॉल्सवाल्यानीं शुक्रवारी आणि शनिवारी नाईट लाईफ जगण्याचा विचार केला आहे. 

26 जानेवारी पासून मुंबई 24 तास योजना सुरु झाली.पहिल्या दिवशी मॉल्स मधील उपहारगृह आणि हॉटेल्स सकाळी 3 वाजे पर्यंत सुरु होती.मात्र,दुसऱ्या दिवशी रात्री दिड वाजण्या पुर्वीच सगळ्याच मॉल्सची बत्ती बंद झाली होती.या बाबत कांदिवली येथील ग्रोव्हेर 101 मॉल्सचे व्यवस्थापन पाहाणारे सचिन धनावडे सांगतात,"मध्यरात्री शॉपिंग करणे हा ग्राहकांसाठीही नविन आहे.त्यामुळे यात हळूहळू बदल होईल.24 तास मुंबई सुरु ठेवण्याच्या निर्णयामुळे व्यावसायिकांच्या उत्पन्नात वाढ होईलच पण,सुरवातील फक्त शुक्रवार आणि शनिवारी नेहमीच्या वेळे पेक्षा जास्त वेळ मॉल्स सुरु ठेवू असे सांगितले. 

अंधेरी इन्फीनिटी,मालाड येथील इनऑर्बिट,गोरेगाव येथील ऑबेरॉय,अंधेरी येथील फन रिपब्लीक,घाटकोपर आणि कुर्ला येथील हाय स्ट्रीट फिनीक्‍स आणि वरळी येथील अट्रीय मॉल मध्ये दुकाने पहाटे पर्यंत सुरु ठेवण्यात येणार होती.मात्र,रात्री दिड वाजण्यापुर्वीच सर्व मॉल्सची बत्ती बंद झाली होती.वरळी येथील अट्रीया मॉलच्या प्रवेशावरच आता 24 तास असा फलक लावला आहे.मात्र,तो मॉलही बंद होता. 

चौपाट्याही ओस 
गिरगाव आणि जुहू चौपाट्यांही मध्यरात्री नंतर ओस पडल्या होत्या.जुहू चौपाटीवर एखादा चुकलेला वाटसरु जाण्याचा प्रयत्न करत होता.तर,त्याला पोलिस पिटाळून लावत होते.तर,गिरगाव चौपाटीवरही मध्यरात्रीनंतर प्रवेश बंदी होती. 

मोठी बातमी - कोरेगाव भीमा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची होणार चौकशी ?

नरीमन पॉईंटला नेहमीचा महोल 
नरीमन पॉईंटला नेहमीच पहाटे पर्यंत पर्यटक असतात.त्यात लोकल चुकलेल्यांचे प्रमाणही असते.तर काही स्वत:च्या गाडीने आलेली मंडळी होती.तर,काही तरुण खास रात्रीच्या वेळी फिरण्यासाठी आलेले होते.तर,प्रेमी युगूलही होते. 

"मुंबई 24 तास सुरु राहाणार हे ऐकलं होतं.पण,प्रत्यक्षात तसं काही दिसत नाही.रात्री काही ठिकाणं सुरु राहील्यास त्याचा सर्वांनाच फायदा होईल.त्यातून नव्या नोकऱ्या तर तयार होतील.पण,सुरक्षेचा विचार करायला हवा.खासकरुन महिलांच्या सुरक्षेचा प्रामुख्याने व्हायला हवा.

तेजस लेंडे - मरीन लाईन्स सी फेस 

मोठी बातमी - नवाब मालिकांचं सुधीर मुनगंटीवारांना ओपन चॅलेंज, म्हणालेत हिम्मत असेल तर...

हा बदल स्विकारयला थोडा वेळ लागेल.पण,24 तास मुंबई सुरु राहाण्याची खरी गरज आहे.आमच्या पिढीतील नोकदारांचा विकऐन्ड आराम करण्यातच जातो.त्यामुळे सहसा आमची संध्याकाळीच पडतो.अशा वेळी रात्री उशीरा पर्यंत मुंबई सुरु राहील्यास त्याचा सर्वांनाच फायदा होणार आहे.

- ओंकार दांडेकर,मरीन लाईन्स सी फेस 

mumbai night life reality check by sakal mumbai
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com