सत्ताधाऱ्यांचा तोल ढळला...? आमदाराच्या विधानाविरोधात संपकऱ्यांचा आक्रमक पवित्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mla sanjay gaikwad

सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी 95 टक्के सरकारी कर्मचारी बाहेरच्या कमाईवर असतात असे ‌बेछूट वक्तव्य केले आहे.

Mumbai News : सत्ताधाऱ्यांचा तोल ढळला...? आमदाराच्या विधानाविरोधात संपकऱ्यांचा आक्रमक पवित्रा

मुंबई - राज्यभरातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बेमुदत संप आंदोलन अत्यंत प्रभावीपणे परंतु शांततेने सुरू आहे. पेंशनच्या मागणीसाठीचा आज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. अशातच आमदार संजय गायकवाड यांच्या विधानामुळे संपकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमदारांनी संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात बेताल वक्तव्य केल्यामुळे त्यांच्याविरोधात मोर्चे काढून निषेध करण्याचा निर्धार सरकारी निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांन केला आहे.

सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी 95 टक्के सरकारी कर्मचारी बाहेरच्या कमाईवर असतात असे ‌बेछूट वक्तव्य केले आहे. सत्ताधारी पक्षाचा, बेमुदत संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तोल तर ढळलेला नाही ना ?असा प्रश्न आहे. आमदार गायकवाड यांच्या या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. उद्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आमदार गायकवाड यांच्या विरोधात मोर्चे काढून निषेध व्यक्त केला जाईल. कर्मचारी शिक्षक हिताचा तात्काळ निर्णय जर सरकारने घेतला नाही, तर हे संप आंदोलन चिघळल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा काटकर यांनी दिला आहे.