मुंबईत वाहनतळांची समस्या गंभीर 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 एप्रिल 2017

मुंबई - दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहनांच्या संख्येत भर पडत असतानाच मुंबईत वाहनतळांची समस्या गंभीर झाली आहे. मुंबईची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता अधिक जमीन उपलब्ध होत नसल्याने राज्य सरकारने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. याचाच भाग म्हणून खासगी जमीन मालकांनी त्यांच्या जागेवर वाहनतळ बांधल्यास प्रोत्साहनात्मक अधिक चटईक्षेत्र देण्याचे धोरण राबविण्यात आले असून, त्याअंतर्गत निर्माण होणाऱ्या 55 वाहनतळांची मुंबई महापालिकेला प्रतीक्षा आहे. तोपर्यंत मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेची डोकेदुखी कायम राहणार असल्याची माहिती गृहविभागातून देण्यात आली. 

मुंबई महापालिकेने 2009 मध्ये रिगल सिनेमा ते हुतात्मा चौक येथील परिसरात पाच ठिकाणी तर क्रॉफर्ट मार्केट येथे दोन भूमिगत वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला होता. यामधून एक हजार 458 वाहनांची प्रश्‍न सुटणार असला तरी, त्यासाठी तब्बल 445 कोटी खर्च होणार होता. यामुळे मुंबई महापालिकेने हा प्रस्ताव गुंडाळला. पार्किंगसाठी अधिकची जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टिने विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीनुसार राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिकेला विशेष योजना राबविण्याची परवानगी दिली. या अधिनियमातील तरतुदीनुसार खासगी जमीनमालकाने किंवा विकसकाने त्यांच्या जागेवर सार्वजनिक वाहनतळ बांधून मुंबई महापालिकेला दिल्यास त्या मोबदल्यात त्यांना प्रोत्साहनात्मक जादा चटईक्षेत्र देण्याची योजना आणली. या योजनेअंतर्गत मुंबई महापालिकेने एकूण 67 सार्वजनिक वाहनतळांना मान्यता दिली आहे. 

Web Title: Mumbai parking problems serious