मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासनाला प्रवाशांनी विचारला जाब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासनाला प्रवाशांनी विचारला जाब

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील चर्नी रोड स्थानक अनेक बाबींमुळे दुरावस्थेत आहे. याबाबत पश्चिम रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी रविवारी, (ता.21) रोजी चर्नी रोड स्थानकात आम्ही गिरगांवकर आणि रेल्वे प्रवासी संघटनांनी आंदोलन केले. पश्चिम रेल्वेच्या परिसरात आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बलाचा ताफा तैनात करण्यात आला होता.

चर्नी रोड स्थानकातील पादचारी पुलाचे निकृष्ट दर्जाचे केलेले बांधकाम, जमिनदोस्त करण्यात आलेली तिकिट खिडकीच्या ठिकाणी अद्याप दुसरी तिकीट खिडकी उभारण्यात आली नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चर्नी रोड येथील महर्षी कर्वे मार्गावरील दक्षिणेकडील तिकीट खिडकीच धोकादायक घोषित करून ही तिकिट खिडकी जमिनदोस्त करण्यात आली. ठाकूरद्वार, भुलेश्वर, फणसवाडी, मुगभाट येथील प्रवाशांसह इतर अनेक भागातील रेल्वे प्रवाशांसाठी सुविधाजनक असलेली तिकिट खि़डकी जमिनदोस्त केल्याने आता प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. प्रवाशांना तिकिट, पास काढण्यासाठी संपूर्ण फलाट चालत जाऊन पर्यायी तिकिट खिडकीकडे जावे लागत आहे.

हेही वाचा: जळगावः आता घरोघरी जाऊन लसीकरणावर भर

यात प्रवाशांचा अधिक वेळ देखील जात आहे. लसवंतांना तिकिट मिळणे सुरू झाल्याने तिकिट काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महर्षी कर्वे मार्गावरील दक्षिणेकडील तिकिट खिडकी सुरू करण्यात यावी. यासह युटीएस अँप, मोबाइल अँप, एटीव्हीएम मशीन व इतर पर्यायी तिकिट काढण्याचे मार्ग सुरू करण्यात यावे, अशी मागणी आम्ही गिरगांवकर यांच्यावतीने करण्यात आली आहे.

हेही वाचा: सोलापूर : ऊस तोडणी मजुरांना फडामध्ये जाऊन दिवाळी साहित्याचे वाटप

दक्षिणेकडील पादचारी पुलावरील तिकिट खिडकी तातडीने बांधण्यात यावी, केळेवाडीतील तोडलेला पादचारी पूल तातडीने बांधून फलाट क्रमांक 2 व 3 यांना जोडावा. नव्याने चर्नी रोड येथे बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाची काही कालावधीतच दुरावस्था झाली आहे. या पादचारी पुलाच्या जिन्यावरील लाद्या निखळल्या आहेत. लाद्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे पुन्हा नव्याने या पादाचारी पुलाची डागडुजी करावी. पादचारी पुलावर छप्पराची व्यवस्था करण्यात यावी, स्थाानकात विद्युत दिवे वाढविण्यात यावेत. तर, मागील दीड वर्षांपासून एटीव्हीएम मशीन बंद पडून धुळखात अवस्थेत आहेत. त्यांना पुन्हा सुरू करण्य़ात यावे, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली. आंदोलनकर्त्यांचे आंदोलन दाबण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर करण्यात आला होता. आंदोलनकर्त्यांना रेल्वे स्थानकात किंवा परिसरात उभे राहून दिले जात नव्हते, असे दिसून आले. त्यामुळे आम्ही गिरगांवकर यांच्यावतीने स्थानक व्यवस्थापकांना मागणीचे निवेदन देण्यात आले. यासह केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांना देण्यात आले.

loading image
go to top