48 तासांत 37 लाख आणि 6 पिस्तुलं, मुंबई पोलीस थेट पत्रकारांसमोर

mumbai crime news
mumbai crime news

मुंबईतच्या मुलुंडमध्ये पडलेल्या दरोड्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. व्हीपी एंटरप्रायझेसच्या कार्यालयात भरदिवसा 70 लाखांचा दरोडा पडला. या प्रकरणातील आरोपी फरार झाले होते. मात्र, पोलिसांनी गतीने चक्र फिरवून तपास केल्यानंतर मोठं घबाड हाती लागलंय. (Mulund Robbery News)

या प्रकरणात 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी 48 तासांत ही कारवाई केली. एकूण लुटलेल्या रकमेपैकी 37 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. यासोबतच 4 पिस्तूल आणि 2 देशी बनावटीचे पिस्तूल ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच 27 जिवंत काडतुसे देखील जप्त करण्यात आली आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली. उर्वरित रक्कमेचा शोध पोलीस घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com