...आणि मुंबई पोलिसच "ट्रोल' झाले! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

मुंबई - कधी कल्पक, कधी विनोदी, कधी उपहासात्मक तर कधी मिश्‍कील... मुंबई पोलिसांच्या ट्विटर खात्यावरील अशा ट्विप्पण्या, "मीम्स' मुंबईकरांच्या ओठांवर स्मिताची रेषा उमटवून जातात. सुमारे 46 लाख अनुगामी असलेला "@ मुंबईपोलिस' हा त्यांचा ट्विटर हॅण्डल जसा मुंबईकर आणि पोलिस दल यांतील संवादसेतू आहे, तसाच तो मुंबईकरांचा मार्गदर्शक, सल्लागारही आहे. कधी-कधी मात्र या खात्यावर एखादी ट्विप्पणी अशी येते की तिने सामान्य मुंबईकरांचीही "सटकते' आणि मग अशावेळी ट्विटरवर जे नेहमी होते तेच होते... ते म्हणजे "ट्रोलिंग.' 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

मुंबई पोलिसांच्या या खात्यावरची रविवारची सकाळही अशीच ट्रोलिंगने उजाडली. सकाळी सकाळी या "हॅण्डल'ने "व्हेरीफाय बिफोर यू शेअर' अशी ट्विप्पणी केली.
 
समाजमाध्यमांवर, प्रामुख्याने व्हॉट्‌सऍपवर आपण अनेकदा कोणतेही संदेश कुठलीही शहानिशा न करताच फॉरवर्ड वा अग्रेषित करतो. तसे करू नये. कोणताही संदेश दुसऱ्यांना पाठविण्यापूर्वी त्याची खात्री करावी, असा हा मुंबई पोलिसांचा सल्ला होता; पण अनेक मुंबईकरांच्या लेखी तो काहीसा "लोकां सांगे ब्रह्मज्ञान...' या छापाचा होता. मग काय, अनेकांनी त्यावरून मुंबई पोलिसांना धारेवरच धरले. 

"अटक करण्यापूर्वी आधी शहानिशा करा', "खोट्या तक्रारी करण्यापूर्वी त्यांची शहानिशा करा' येथपासून तर "वेळेवर मदत करा', "कोणाबद्दल मत बनविण्यापूर्वी त्याची खात्री करा', "निरपराध व्यक्तींना पकडण्यापूर्वी त्याची शहानिशा करा...' अशा ट्विप्पण्या धडाधड पडू लागल्या. कहर म्हणजे एकाने तर "हे भाजपच्या आयटी सेलला सांगा' असा अनाहूत सल्ला देऊन मुंबई पोलिसांची दांडीच उडवली. या सगळ्या ट्रोलिंगवर मुंबई पोलिसांचे काय उत्तर आहे हे मात्र समजू शकले नाही. बहुधा जल्पकांना उत्तर देऊ नये या समाजमाध्यमी नियमाचे पालन करण्यास ते आता शिकले असावेत.

Web Title: Mumbai police became troll