पोलिस महासंचालकपदी पडसलगीकर? 

मंगळवार, 26 जून 2018

मुंबई - मुंबईचे पोलिस आयुक्‍त दत्ता पडसलगीकर यांची लवकरच राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती केली जाण्याची शक्‍यता आहे. निवृत्तीनंतरही त्यांना या पदावर पूर्ण दोन वर्षे काम करण्याची संधी मिळण्याचीही शक्‍यता आहे. 

मुंबई - मुंबईचे पोलिस आयुक्‍त दत्ता पडसलगीकर यांची लवकरच राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती केली जाण्याची शक्‍यता आहे. निवृत्तीनंतरही त्यांना या पदावर पूर्ण दोन वर्षे काम करण्याची संधी मिळण्याचीही शक्‍यता आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना पोलिस महासंचालकांना निवृत्तीनंतरही मुदतवाढ दिली होती. आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या दोन राज्यांतही पोलिस महासंचालकपदावर नेमणूक झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना दोन वर्षांचा कालावधी पूर्ण करण्याची मुभा देण्यात आली होती. त्याच धर्तीवर मुंबईचे पोलिस आयुक्‍त पडसलगीकर यांना महासंचालकपदाचा दोन वर्षांचा संपूर्ण कालावधी देण्यात यावा, असा विचार सुरू आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळेही निवृत्तीनंतर त्या पदावर नेमल्या गेलेल्या अधिकाऱ्याला मुदतवाढ देणे शक्‍य होणार आहे. राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर महिनाअखेरीस निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी सेवाज्येष्ठतेनुसार पडसलगीकर यांना नेमले जाईल. ते 31 ऑगस्टला निवृत्त होत आहेत. केवळ काही महिन्यांसाठी या पदावर नेमणूक करायची काय, असा विचार सुरू असतानाच अन्य राज्यांची उदाहरणे, तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय समोर आला आहे. 

मुंबई आयुक्तपदी बर्वे किंवा जयस्वाल? 
गुप्तवार्ता विभागाचा अतिरिक्‍त कार्यभार सांभाळणारे संजय बर्वे किंवा सध्या केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या सुबोध जयस्वाल यांना मुंबईच्या आयुक्‍तपदी नेमले जाईल, अशी चर्चा आहे. जयस्वाल यांना आपणास महाराष्ट्र सरकारच्या सेवेत परत यायचे आहे काय, अशी विचारणा करणारे औपचारिक पत्र पाठवण्यात आले आहे. ठाण्याचे आयुक्‍त परमवीर सिंग यांचीही मुंबई आयुक्‍तपदासाठी चर्चा सुरू आहे. 

Web Title: Mumbai Police Commissioner Datta Padsalgikar