मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना मुदतवाढ

मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना मुदतवाढ

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. बर्वे या महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. यापूर्वी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनाही सरकारने सेवानिवृत्तीनंतर मुदतवाढ दिली होती. बर्वे यांची निवृत्ती होणार असल्याच्या अपेक्षेमुळे अनेक आयपीएस अधिकारी या पदासाठी इच्छुक होते.

बर्वे 31 ऑगस्ट रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तसेच कलम 370 हटवण्यात आल्यामुळे सर्वत्र सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवू नये, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांतरही त्यांना आणखी तीन महिने मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बर्वे हे स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नावाला पसंती दर्शवली. याशिवाय शिवसेनेनेही मराठी अधिकारी असल्यामुळे बर्वे यांच्या नावाला पसंती दर्शवली होती. त्यामुळे त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळणे जवळपास निश्‍चित होते.

महिन्याभरापासून बर्वे यांना मुदतवाढ मिळणार की नाही? अशा चर्चा रंगण्यात आल्यामुळे त्यांच्याविरोधात काही अमराठी अधिकाऱ्यांनी लॉबिंग करण्यास सुरवात केली होती. पण त्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी स्वच्छ प्रतिमेला पंसती दर्शवत बर्वे यांनी तीन महिने मुदतवाढ देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com