चक्क मुंबई पोलिसचं सांगताहेत नागरिकांना मास्क घालण्याची योग्य पद्धत

पूजा विचारे
Friday, 24 July 2020

मुंबई पोलिसांनी मास्क लावणं अनिवार्य असल्याची पुन्हा एकदा आठवण करुन देत एक पोस्ट शेअर केली आहे. 

मुंबईः सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसचा विळखा आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडाही वाढताना दिसतोय.  मुंबईत सर्वाधिक या व्हायरसचा प्रार्दुभाव झालेला पाहायला मिळाला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. तसंच नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी प्रशासनानं मास्क वापरणं अनिवार्य केलं आहे. मात्र अजूनही काही नागरिक मास्क न वापरत असल्याच्या घटना समोर येतात. तसंच मास्क लावण्याची पद्धतही चुकीची असते, काही जण नाकाच्या खाली मास्क लावताना आढळून येतात. त्यातच मुंबई पोलिसांनी मास्क लावणं अनिवार्य असल्याची पुन्हा एकदा आठवण करुन देत एक पोस्ट शेअर केली आहे. 

या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनी या प्राणघातक व्हायरसपासून बचाव करण्यासाठी कशी सावधगिरी बाळगायची याचं महत्त्व समजावून सांगितलं आहे. मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या कार्यालयाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये, काही नागरिक चुकीच्या पद्धतीनं मास्क घालतात. तो मास्क कसा योग्यरित्या वापरावा याचं स्पष्टिकरण दिलं आहे. पोस्टमध्ये एक असामान्य दृष्टिकोन शेअर केला गेला आहे ज्यामध्ये एक माणूस झोपी गेलेला आहे आणि चादर म्हणून मास्क वापरत असल्याचं दर्शवण्यात आलं आहे. या पोस्टवर कॅप्शन लिहिण्यात आलं की, दरम्यान अद्याप मास्क वापरण्याचा हा योग्य मार्ग नाही. या पोस्टला #Don'tSleepOnMasks हा हॅशटॅग वापरण्यात आला आहे. 

गुरुवारी शेअर केलेल्या पोस्टला बऱ्याच जणांनी लाईक केले असून अनेक जणांनी हे ट्विट रिट्वीट केलंय. 

व्हेंडिंग मशिनमध्ये मिळणार मास्क 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी मध्य रेल्वे स्थानकात स्वयंचलित व्हेंडिंग मशीनमधून मास्क, सॅनिटायझर आणि हँडग्लोव्हज देण्याचा निर्णय घेतला आहे.  या व्हेंडिंग मशीनमधून तुम्हाला मास्क, सॅनिटायझर आणि हॅंड ग्लोव्हज  सहज उपलब्ध होणार आहेत. 

हेही वाचाः  चांगली बातमी! अखेर 'या' रुग्णांसाठी नायर रुग्णालयाचे दरवाजे खुले

दादर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर हे मास्क आणि सॅनिटायझर व्हेंडिंग मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.  लवकरच ही सुविधा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,  लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांवर उपलब्ध होईल. याशिवाय 12 स्थानकांत हेल्थ एटीएमही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai Police Commissioner tweet tell way of Wearing Mask 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Police Commissioner tweet tell way of Wearing Mask