पोलिसदादा गळक्‍या छताखाली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

मुंबई - भरपावसामध्ये वाहतुकीचे नियोजन करणाऱ्या पोलिसांना त्यांच्या कुटुंबीयांसह घरातही अशाच परिस्थितीत दिवस काढावे लागत आहेत. माहीमच्या कादरी वसाहतीत राहणाऱ्या पोलिस कुटुंबीयांची अशी स्थिती झाली आहे. पोलिसदादा कर्तव्यावर गेले की गळणाऱ्या छतांखाली बादल्या लावत त्यांच्या पत्नींना आपल्या संसाराचे नियोजन करावे लागते.

मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या माहीम परिसरात ही वसाहत आहे. पावसाळ्यात येथील छतातून गळती होत असल्याने येथे राहणारे पोलिस कुटुंबीय भीतीच्या छायेत आहेत. ‘सकाळ’च्या पाहणीत येथील एका घराच्या इलेक्‍ट्रिक बोर्डच्या वरूनच पाणी गळत असल्यामुळे शॉर्टसर्किटचा धोकाही आहेच. अनेक ठिकाणी लहान-मोठे विजेचे धक्केही बसल्याच्या घटना आहेत. 

गळतीचे पाणी पिलर व बीममध्ये गेल्यामुळे आतील सळ्या गंजतात. त्यामुळे त्यांना तडे जाऊन बांधकामाचा ढाचा कमकुवत होतो. गंजलेल्या सळ्या दिसून येत नसल्याने प्रशासनाचे या धोक्‍याकडे दुर्लक्ष होते. ही साधी पाणी गळती आहे, असे सांगून वेळ मारून नेली जाते.

वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने जीव मुठीत धरून या कुटुंबांना घरात राहावे लागत आहे. छताचा काही भाग धोकादायक असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यावर उपाययोजना होत नसल्यामुळे पोलिस कुटुंबांमध्ये नाराजी आहे.

झोपडपट्टी परवडली!
माहीममध्ये अनेक झोपड्या होत्या. त्यांनाही पुनर्विकासा अंतर्गत चांगली घरे मिळाली; मात्र पोलिस कर्मचाऱ्यांना घरासारखी मूलभूत सुविधाही व्यवस्थित उपलब्ध करून दिली जात नसल्याबद्दलही एका पोलिस कुटुंबातील सदस्याने नाराजी व्यक्त केली.

Web Title: mumbai police house