ड्रग्जच्या विषयाकडे मुंबई पोलिसांनी बारकाईने लक्ष देण्याची गरज; शरद पवार यांची सूचक प्रतिक्रीया

तुषार सोनवणे | Friday, 11 September 2020

राज्यातील जेष्ठ राजकीय नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील ड्रग्जप्रकरणी महत्वपुर्ण विधान केलं आहे,

मुंबई - राज्यात गेल्या काही दिवसांपासून कंगना रानौत आणि सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या विषयांनी जोर धरला होता. या प्रकरणात ड्रग्ज एँगलसमोर आल्याने, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याबाबत राज्यातील जेष्ठ राजकीय नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वपुर्ण विधान केलं आहे,

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणानंतर अंमली पदार्थांच्या रॅकेटचा मुद्दा ऐरणीवर आला, त्यानंतर रिया चक्रवतीला अटकसुद्धा करण्यात आली. आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अभिनेत्री कंगना रानौतच्या ड्रग्ज कनेक्शन बाबत चौकशीच करण्याचे संकेत दिले आहेत. यासर्वांवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रीया ट्विटद्वारे दिली आहे, ते म्हणतात सुशांत सिंह प्रकरणामुळे समोर आलेल्या ड्रग्जच्या विषयाकडे मुंबई पोलिसांनी बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. तरुण पिढीमध्ये अशी व्यसनाधीनता वाढवण्याचा प्रयत्न होत असेल तर हे थांबायला हवं. यात तरुणांचे पालक व मुंबई पोलिसांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

 

 

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणात ड्रग्ज एँगल समोर आल्यानंतर तरुण पिढीमध्ये वाढणाऱ्या व्यसनाधीनतेवर त्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच विशेतः मुंबई पोलिस आणि पालकांनी यात जातीने लक्ष देण्याच्याही सूचना त्यांनी केल्या आहेत.