
मुंबईतील रस्त्यावर ट्राफिक जाम; पोलिसांनी पैसे घेतले अन् निघून गेले... Video होतोय Viral
मुंबई : मुंबईत ट्राफिक पोलिसांनी वाहतून कोंडी झाल्यामुळे वाहतूक करणाऱ्या हातगाडी मालकाकडून पैसे घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भाती एक व्हिडिओ समोर आला असून सकाळ माध्यम या व्हिडिओची पुष्टी करत नाही. मुंबईतील कलबा देवी परिसरातील घटना असल्याचं व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा - वर्क फ्राॅम होम ते 'कायमचे घरी बसा?' हा प्रवास नक्की काय सांगतोय...
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाची एक गाडी दिसत आहे. MH 01 AN 1594 हा पोलिसांच्या गाडीचा क्रमांक असून ही पोलिसांची गाडी मालवाहू हातगाडीच्या शेजारी उभी असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. तेवढ्यात एक व्यक्ती दुसऱ्या एका व्यक्तीकडून काही पैसे घेत पोलिसांना देताना व्हिडिओत दिसत आहे.
दरम्यान, @mumbaimatterz या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सदर पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी अनेक नेटकऱ्यांनी केली आहे.