सेल्फीच्या नादात चढला बहुमजली इमारतीवर आणि...; मुंबई पोलिसांनी केला व्हिडीओ शेअर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मे 2019

मुंबई पोलीसांनी ट्विटरवर बहुमजली इमारतीवरुन तरुण कितीतरी फूट खाली कोसळतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.  

मुंबई : सेल्फी घेण्याच्या नादात आजपर्यंत अनेक जणांनी आपल्या जीवाशी खेळ केला आहे. असाच एक खेळ करत एका तरुणाने बहुमजली इमारतीवरुन खाली पडून आपला जीव गमावला आहे. हा व्हिडीओ मुंबई पोलीसांनी ट्विटरवरुन शेअर करत 'असे बेजबाबदार धाडस करु नका' हा संदेश दिला आहे.

मुंबई पोलीसांनी ट्विट केलेल्या या व्हि़डीओत दिसत आहे की, एक तरुण एका उंच इमारतीच्या गच्चीच्या टोकावर उभा आहे. तिथे उभा राहुन तो सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत आहे. सेल्फी घेण्याच्या नादात त्या तरुणाचा तोल जातो आणि तो त्या बहुमजली इमारतीवरुन खाली कोसळतो.  

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे नेमके कळू शकले नाही. पण मुंबई पोलीसांनी व्हिडीओ ट्विट करताना कॅप्शन दिले आहे की, 'हा सर्वात साहसी पध्दतीने सेल्फी घेण्याचा प्रयत्न होता? की फक्त आणखी एक बेजबाबदार धाडस? हे जे काही होते, पण नक्कीच जोखीम घेण्याच्या लायकीचे नव्हते.'

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai police tweeted a video about man fall from building while taking selfie

टॅग्स