आयुक्तांचे मुंबई महिला पोलिस कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट; आता ८ तासांची असणार ड्युटी

मुंबई पोलिस दलातील महिला कर्मचाऱ्यांची ८ तासांची शिफ्ट आजपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी घेतलाय.
महिला पोलीस कर्मचारी
महिला पोलीस कर्मचारीटिम ई सकाळ

मुंबई पोलिस दलातील महिलांसाठी यंदाचा महिला दिन खुप विशेष असणार आहे. मुंबई पोलिस दलातील महिला कर्मचाऱ्यांची ८ तासांची शिफ्ट आजपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी घेतलाय. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्त महिला कर्मचाऱ्यांना हे खास गिफ्ट असल्याचे बोलले जात आहे.

कोरोना काळात मुंबई पोलिस दलातील महिला कर्मचाऱ्यांची शिफ्ट २४ तासाची करण्यात आली होती. त्यामुळे महिलांसाठी खाजगी आणि कामातील आयुष्यातील समतोल राखणे कठीण झाले होते. मात्र आता महिला पोलीस कर्मचाऱ्यांना या अडचणीतुन दुर करण्याकरीता महिला कर्मचाऱ्यांची पुन्हा ८ तासांची शिफ्ट आजपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महिला पोलीस कर्मचारी
'दिल्लीच्या आक्रमणासमोर 'झुकेगा नहीं'; छापेमारीवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

महिला कर्मचाऱ्यांसाठी ८ तासांच्या शिफ्टमध्ये दोन पर्याय असणार आहेत. प्रत्येक पर्यायामध्ये ३ शिफ्ट्स आहेत. पहिला पर्याय हा सकाळी ८ ते ३, दुपारी ३ ते १० आणि रात्री १० ते सकाळी ८ अशी आहे तर दुसऱ्या पर्यायामध्ये सकाळी ७ ते दुपारी ३, दुपारी ३ ते ११ आणि रात्री ११ ते सकाळी ७ अशा शिफ्टच्या वेळा आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com