
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज आरे जंगलाची सफारी केली. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली
मुंबई - राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज आरे जंगलात फेर फटका मारला. जंगलातील पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक रहिवाशांची त्यांनी संवाद साधला. आरे मधील नागरिकांचे प्रश्न यावेळी त्यांनी जाणून घेतले. एवढेच नाही तर, रोहित पवारांनी यांनी स्वतः रिक्षा चालवत आरे कॉलनीची सैर केली. यावेळी त्यांनी क्रिकेट खेळण्याचाही आनंद लुटला.
आरेतील स्थानिक अदिवासींच्या प्रश्नांवर सरकारच्या SRA योजना राबवण्यात येत आहेत. त्या थांबवल्या जाव्यात अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी पवार यांच्याकडे यावेळी केली. वॉक द टॉक या संवाद कार्यक्रमासाठी रोहित पवार उपस्थित होते. त्यावेळी पर्यावरण प्रेमी, अदिवासी यांच्या प्रश्नांसाठी मार्ग नक्की काढू असे आश्वासनही पवार यांनी दिले. या संवादावेळी रोहित पवारांनी केंद्र सरकारवर टीका केली. ' मेट्रो कारशेड संदर्भात निश्चित मार्ग काढू, पण केंद्र सरकारने मेट्रोच्या कारशेडचं राजकारण करु नये. राज्य सरकारशी सहकार्य करावं. कुठल्याही पद्धतीचा अहंकार याबाबतीत ठेवू नये”
संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या रोहित पवारांनी आरे कॉलनीची रपेट मारली. त्यांनी झाड लावून पर्यावरण वाचवण्याचा संदेश दिला. यासोबतच क्रिकेट, व्हॉलिबॉल खेळण्याचा आनंदही त्यांनी लुटला.
----------------------------------------------
mumbai political marathi Rohit Pawar criticizes Central Government during Aarey Jungle Safari politics latest