"सरकार याच दिवसाची आतुरतेने वाट पाहत होती का ? संजय राऊतांची तिखट प्रतिक्रिया

सुमित बागुल
Tuesday, 26 January 2021

आजच्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय वातावरण कसं तापते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

मुंबई : आज देशाने जे पाहिलं ते या आधी कधीही पाहिलं नव्हतं. शेतकऱ्यांचं आंदोलन हिंसक झाल्यानंतर आता देशभरातील विविध राजकीय नेत्यांकडून आणि पक्षांकडून प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतायत. महाराष्ट्रातील शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी देखील आजच्या शेतकरी आंदोलनानंतर ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्या ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत यांनी देशात लोकशाही आहे की नाही असा थेट सवाल उपस्थित केलाय. आज दिल्लीत जे घडलं त्यानंतर कुणाचा राजीनामा मागायचा हा देखील सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.  

REPUBLIC DAY: आपला राष्ट्रध्वज फडकविण्याचे 'हे' नियम तुम्हाला माहिती आहेत का?

संजय राऊतांनी केलेलं ट्विट्स : 

महत्त्वाची बातमी "घटनेचं संरक्षण करावं लागेल, देशात अराजकता निर्माण होतेय", बाळासाहेब थोरातांच केंद्रावर टीकास्त्र

संजय राऊत म्हणालेत... 

जर सरकारला आजची हिंसा रोखायची असती तर सरकार सहज रोखू शकली असती. दिल्लीत जे सुरु आहे त्याच्या समर्थनार्थ कुणीही उभं राहू शकत नाही. कुणीही लाल किल्ला आणि तिरंग्याचा अपमान सहन करू शकत नाही. मात्र परिस्थिती का बिघडली? सरकार किसान विरोधी कायदे का रद्द करत नाही ? कुणी अदृश्य हात यामागे नाहीत ना ? जय हिंद.

सरकार याच दिवसाची आतुरतेने वाट पाहत होती का ? सरकारने शेवटपर्यंत लाखो शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकलं नाही. आपल्या देशातील ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे ? ही लोकशाही नाही, काहीतरी वेगळंच सुरु आहे. जय हिंद.

आता, आजच्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय वातावरण कसं तापते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

mumbai political news tractor rally become violent in Delhi reaction of sanjay raut on farmers protest


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai political news tractor rally become violent in Delhi reaction of sanjay raut on farmers protest