esakal | संजय राठोड यांच्या राजिनाम्यासाठी भाजपतर्फे मुंबईत रास्ता रोको

बोलून बातमी शोधा

संजय राठोड यांच्या राजिनाम्यासाठी भाजपतर्फे मुंबईत रास्ता रोको}

पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्याप्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी राजिनामा द्यावा या मागणीसाठी आज मुंबई भाजप महिला मोर्चातर्फे अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला.

संजय राठोड यांच्या राजिनाम्यासाठी भाजपतर्फे मुंबईत रास्ता रोको
sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई  - पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्याप्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी राजिनामा द्यावा या मागणीसाठी आज मुंबई भाजप महिला मोर्चातर्फे अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. 

याप्रकरणी राठोड यांच्याकडे संशयाची सुई असल्याने निष्पक्ष चौकशीसाठी त्यांनी राजिनामा द्यावा, अशी भाजप ची मागणी आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज सायन, मुलुंड, बोरिवली आदी ठिकाणी भाजपच्या महिला आघाडीतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हातात निषेधाचे फलक घेतलेल्या महिलांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

मुंबई, पालघर, रायगड, ठाणे परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

सायन येथील आंदोलनाचे नेतृत्व भाजप महिला मोर्चाच्या मुंबई अध्यक्ष व नगरसेविका श्रीमती शीतल गंभीर देसाई तसेच महिला मोर्चाच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष नगरसेविका आशा मराठे यांनी केले. याप्रकरणी राठोड यांचे शिवसेना नेतृत्वाकडून ज्या प्रकारे समर्थन केले जात आहे त्यामुळे शिवसेना समर्थक महिलांचाही भ्रमनिरास झाला आहे. संशयितांना पाठीशी घालण्याच्या वृत्तीमुळे महिलांना असुरक्षित वाटते आहे, अशी टीका श्रीमती देसाई यांनी यावेळी केली. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. नंतर सर्वांना मुक्त करण्यात आले.

--------------------------------

( Edited by Tushar sonawane )

mumbai politics marathi BJP block road in Mumbai for Sanjay Rathores resignation political pooja chavhan update